ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केलेल्या ‘या’ भारतीय गोलंदाजाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज विनय कुमार याने ट्विटरद्वारे आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विनय कुमार याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द जास्त काळ टिकली नाही पण क्रिकेटमध्ये त्याचं नाव आदराने घेतले जाते. विनय कुमार हा कर्नाटक संघाचं नेतृत्व करत होता. विनय कुमार याच्या नेतृत्वात कर्नाटकच्या संघाने रणजी करंडक सुद्धा जिंकला होता.

विनय कुमार याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४१ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४९ विकेट्स घेतल्या आहेत. विनय कुमारच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर माजी प्रशिक्षक आणि दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे यांच्याकडून विनय कुमार याचे कौतुक करण्यात आले आहे.

२०१० साली विनय कुमारने भारतीय संघात पदार्पण केलं होते. आणि त्या सामन्यात रोहित शर्मानं आपलं पहिलंवहिलं एकदिवसीय शतक केले होते. आणि आश्चर्याची गोष्ट अशी कि विनय कुमारने २०१३ साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. त्या सामन्यामध्ये सुद्धा रोहित शर्माने वादळी द्विशतकी खेळी साकारली होती. पण विनय कुमारचा शेवटचा सामना काही खास ठरला नाही. या सामन्यात त्याने ९ षटकांमध्ये १०० पेक्षा अधिक धावा दिल्या होत्या.