पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील अपात्र

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – जात पडताळणी प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने पाचोरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजय गोहील (शिवसेना) यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.

नोव्हेंबर २०१६ मध्ये पाचोरा नगरपालिकेची निवडणूक झाली होती. शिवसेनेचे संजय गोहील हे अनसूचित जाती संवर्गातून निवडून आले होते. त्यांची नगराध्यक्ष पदी निवड झाली होती, यानंतंर त्यांनी सहा महिन्याच्या आत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले  नाही. त्यामुळे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात पराभूत उमेदवार अजय भास्कर अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केला होता. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी सुनावणी घेतली. त्यावेळी गोहिल सहा महिन्यात जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यात असमर्थ ठरल्याने त्यांना अपात्र घोषित केले.