पद्म पुरस्कारांची घोषणा, महाराष्ट्रातील 6 जणांचा गौरव, जाणून घ्या इतर पुरस्कारांचे मानकरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आज (मंगळवार) पद्म पुरस्कारांची घोषणा झाली. या महाराष्ट्रातून सामाजिक कार्यातील सिंधूताई सपकाळ आणि गिरीश प्रभूणे या दोघांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्कार घोषित करण्यात आलाय. यासह जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीमध्ये दिवंगत गायक एस.पी. बालसुब्रमण्याम यांचाही समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.

पद्मश्री
सिंधूताई सपकाळ (सामाजिक कार्य)
गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य)
नामदेव कांबळे (साहित्य)
परशूराम गंगावणे (साहित्य)
जसवंती बेन जमनादास पोपट (उद्योग)

पद्मभूषण
सुमित्रा महाजन (माजी लोकसभा सभापती)
रामविलास पासवान (दिवंगत नेते, लोक जनशक्ती पक्ष)
तरुण गोगोई (दिवंगत नेते, आसामचे माजी मुख्यमंत्री)
कल्बे सादिक (दिवंगत मुस्लिम नेते)

पद्मविभूषण
शिंजो आबे (जपानचे माजी पंतप्रधान)
एस. पी. बालसुब्रमण्यम (दिवंगत, गायक-संगीतकार)
सुदर्शन साहो (सँड आर्टिस्ट)
बी. बी. लाल (पुरातत्वशास्त्रज्ञ)