Padma Awards | पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन; अध्यक्षपदी सुधीर मुनगंटीवार, ‘या’ नेत्यांचाही समितीमध्ये समावेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Padma Awards | पद्म पुरस्कार हे भारत सरकारकडून (India Government) देण्यात येणाऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे. केंद्राला पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards) नावांची शिफारस करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापित करण्यात आली. या समितीमध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil), सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि अप्पर मुख्य सचिव (Upper Chief Secretary) (राजशिष्टाचार) यांचा समावेश असणार आहे.

विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारांसाठी (Padma Awards) शिफारस करण्याचे निर्देश केंद्र सरकारने (Central Government) राज्य सरकारला (Maharashtra Government) दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारकडून 26 जानेवारी 2024 रोजी घोषित करण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. आता ही समिती विविध माध्यमातून आलेल्या नावांची छाननी करून केंद्राकडे पाठवणार आहे.

पद्म पुरस्कारासाठी मान्यवरांची निवड करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांकडून (PM) प्रतिवर्षी एक समिती नियुक्त करण्यात येते. या समितीला पद्म-पुरस्कार-समिती असे म्हटले जाते. राज्य सरकारकडून गठित केलेली समिती ही मान्यवरांच्या नावांची शिफारस या समितीकडे करते. या समितीचे प्रमुख मंत्रिमंडळ-सचिव (कॅबिनेट सेक्रेटरी) असतात. तसेच गृहसचिव, राष्ट्रपतींचे सचिव आणि 4 ते 6 ख्यातनाम व्यक्तींचा या समितीत समावेश असतो. ही समिती शिफारस केलेल्या नामांकनातून पुरस्कारासाठी नावे निवडली जातात.
त्यानंतर ही नावे पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर केले जाते.

1954 पासून भारतरत्न (Bharatratna) आणि पद्मविभूषण (Padma Vibhushan)
असे दोन नागरी पुरस्कारांना सुरुवात झाली. यामधील पद्म पुरस्कार हा 3 वर्गात विभागून देण्यात येतो.
हा पुरस्कार पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गात विभागून देण्यात येतो.
राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे 8 जानेवारी 1955 या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण,
पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Samruddhi Mahamarg | समृद्धी महामार्गावर केमिकल घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग; संपूर्ण ट्रक जळून खाक