अणु शास्त्रज्ञ ‘पद्मश्री’ डॉ. शेखर बसु यांचं ‘कोरोना’मुळं निधन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष व प्रसिद्ध अणु शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शेखर बसु यांचं कोरोनामुळं निधन झालं आहे. ते 68 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोना असल्याचं निदान झालं होतं. त्यांच्यावर कोलकात्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

काही दिवसांपूर्वीच डॉ बसु यांना कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना कोलकात्यामधील एका खासगी रग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. डॉ. शेखर बसु यांना कोरोनासोबतच किडनीचाही त्रास होता.

डॉ बसु यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ते मेकॅनिकल इंजिनियर होते. देशाच्या अणुऊर्जा क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. विशेष बाब अशी की, डॉ शेखर बसु यांनी अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतसाठी अत्यंत कठिण असणारी अणुभट्टी देखील तयार केली होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like