पद्म विभूषण सन्मानित सुप्रसिध्द कलाकार सतीश गुजराल यांचं 94 व्या वर्षी निधन, PM मोदींनी व्यक्त केला खेद

पोलीसनामा ऑनलाईन :प्रसिद्ध कलाकार आणि आर्कीटेक्ट सतीश गुजराल यांचं निधन झालं आहे. 94 व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला आहे. कला विश्वातील एक रंजीत होसकोटे यांनी शुक्रवारी सांगितलं की, गुरुवारी मध्यरात्री गुजराल यांचं निधन झालं आहे. त्यांनी पीटीआयला सांगितलं की, “गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते.”पद्म विभूषण पुरस्कारानं सन्मानित सतीश गुजराल एक आर्किटेक्ट, चित्रकार, भित्तीचित्र आणि ग्राफिक कलाकार होते.

पंतप्रधान नेरंद्र मोदी यांनी गुजराल यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत म्हटलं की, दृढ वचनबद्धतेमुळं त्यांनी संकटावर मात केली आहे. ट्विट करत पीएम मोदी म्हणाले, “सतीश गुजराल एक अष्टपैलू व्यक्तीमत्व असणारे व्यक्ती होते. गुजराल यांना त्यांच्या बौद्धिक उत्सुकतेनं खूप पुढे नेलं. त्यांच्या निधनामुळं दु:खी आहे. ओम शांती.”

सतीश गुजराल यांच्या प्रमुख कामांबद्दल सांगायचं झालं तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या बाहेरच्या भिंतीवर अल्फाबेट भित्तीचित्र त्यांनी केलं आहे. दिल्लीत त्यांनी बेल्जियमदूतावासही डिझाईन केलं आहे. त्यांच्या कलाकृतींमध्येही त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांच्या चढ-उतारांची माहिती मिळते. यात त्यांच्या लहानपणीच श्रवणशक्तीवर परिणाम करणारा आजार आणि देशाच्या विभाजनाचा समावेश आहे.