..हे पुरस्कार लोकपुरस्कृत : अनिल सहस्त्रबुध्दे

पद्मगंगा फाऊंडेशनच्यावतीने ग्रंथ पुरस्काराचे वितरण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पुरस्कार्थींच्या साहित्याचा समाजाने पुरस्कार केला असून, ते लोकपुरस्कृत आहेत. अशा साहित्याने समाजात परिवर्तन घडणार आहे. मनुष्याला विचार मांडायचे असते. ते शब्दात प्रकट झाल्यास साहित्य तयार होते. लोकसाहित्याचे गाढे अभ्यास म्हणून मोरजे सरांची ओळख होती. लोकसाहित्य स्वतंत्र्य अभ्यास क्षेत्र असल्याचे व लोकसाहित्य जीवनकला ही वाड्मयकला असल्याचे दोन सूत्र त्यांनी जगाला दिले असल्याची भावना माजी प्राचार्य अनिल सहस्त्रबुध्दे यांनी व्यक्त केली.

स्व.प्रा.डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतीदिना निमित्त पद्मगंगा फाऊंडेशन आयोजित ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात सहस्त्रबुध्दे बोलत होते. हमाल पंचायतच्या भवनात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य खासेराव शितोळे व अशोक शिंदे उपस्थित होते.

प्रास्ताविकात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.धोंडीराम वाडकर यांनी दरवर्षी साहित्य क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे 12 वे वर्ष असून, यावर्षी पुरस्कार्थींची संख्या वाढविण्यात आल्याचे व सामजिक क्षेत्रात योगदान देणार्‍या व्यक्तींचा देखील गौरव करण्यात येत असल्याचे सांगितले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते डॉ.बाळासाहेब बळे (पारधी समाज लोकजीवन आणि लोकसंस्कृती), अ‍ॅड. बाळ ज. बोठे (राजकारण व माध्यमे), डॉ.संजय कळमकर (झुंड), सु.द. घाटे (रुमणपेच), सचिन भेंडभर (येथे जगावया उभारी), डॉ.देविदास शेटे (संत तुकारामाच्या प्रभावळीतील संत रचना), प्रा.विठ्ठल बरसवाड (विठू माऊली), डॉ.बालाजी पोतुलवार (मराठी स्त्री नाटक शोध आणि बोध), डॉ.मानसी लाटकर (कबीर एक द्रष्टा समाजसुधारक), अशोक कुरापाटी (संकल्पयोगी) या साहित्यिकांना त्यांच्या उकृष्ट ग्रंथाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आला. रामजी देगुरे (लातूर) व सुनील गोसावी (नगर) यांना सामाजिक पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच प्रा.डॉ.संदिप सांगळे, सहा. फौजदार राकेश खेडकर, डॉ.निर्मला पालेकर (नवजात शिशू विभाग प्रमुख जिल्हा रुग्णालय) यांचा विशेष सन्मान करण्यात आला. ग्रंथांचे परिक्षक म्हणून काम पाहिलेले प्रा.डॉ. सुधाकर शेलार, प्रा.मच्छिंद्र माळूंजकर, डॉ.अरुणनरसाळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

संजय कळमकर यांनी पुरस्कार्थी साहित्यिकांनी लिहिलेली पुस्तके काल्पनिक नसून, आलेले अनुभव व वास्तवातून लिहिलेली आहे. पुरस्कार मिळाल्यास आपली वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याची खात्री होत असल्याचे सांगितले. प्रा.डॉ.संदिप सांगळे यांनी समाजातील दुर्लक्षीत तळागाळातील कार्यकर्त्यांचा पद्मगंगा फाऊंडेशनने गौरव केला आहे. पुणे-मुंबईपलीकडे देखील ग्रामीण भागात साहित्येचे सेवेकरी असून, त्यांचा हा सन्मान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. परिक्षक प्रा.डॉ. सुधाकर शेलार यांनी पुरस्कार्थींच्या संशोधनात्मक ग्रंथांत तथ्य असल्याने समाजाने त्याचा स्विकार केला आहे. वाचन संस्कृती फुलविण्यासाठी फाऊंडेशनने ग्रंथांना पुरस्कार देऊन, लोकसाहित्य क्षेत्रात मोरजे सरांचे विचार जपल्याचे सांगितले. प्राचार्य अशोक शिंदे यांनी मोरजे सरांच्या सहवासातील अनुभव व आपला शैक्षणिक क्षेत्रातील जीवन प्रवास उगडला. तर ज्ञानवंताच्या स्मृतीप्रित्यर्थ मिळालेला पुरस्काराला मोठी किंमत असल्याचे सांगितले.
खासेराव शितोळे म्हणाले की, समाजातील उपेक्षितांचे जीवन साहित्यिकांनी पुस्तकरुपात जगा समोर मांडले. निर्माण केलेल्या सहित्यातून त्यांनी विचार करण्यास भाग पाडले असून, त्यांनी नवीन संशोधन करुन अजून साहित्य पुढे आनावे. पुरस्कार आत्मविश्‍वास जागृक करण्याचे काम करीत असल्याचे ते म्हणाले.

अविनाश घुले यांनी दरवर्षी होणार्‍या या पुरस्कार कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक प्रतिभावंत साहित्यिकांचे चरण कष्टकर्‍यांच्या नगरीला लाभत आहे. हमाल पंचायतच्या वतीने चालू असलेल्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केल्याने आनखी काम करण्याचे बळ मिळाल्याचे सांगून, या कार्यक्रमास सर्वपरीने सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. अखंडपणे मोरजे सरांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरस्काराचा कार्यक्रम घेणारे पद्मगंगा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.धोंडीराम वाडकर व त्यांच्या परिवाराचा उपस्थित पाहुणे व पुरस्कार्थींनी सत्कार केला. यावेळी प्रा.जालिंदर कानडे, प्राचार्य मच्छिंद्र फसले, डॉ.गोपीनाथ बोडखे, डॉ.विलास धनवे, डॉ.खिळदकर, डॉ.एलवंडे, डॉ.नकुल वाड, भालचंद्र घारे, डॉ.सिनारे, डॉ.सुर्यवंशी, शर्मिला गोसावी आदिंसह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुर्यकांत वरकड यांनी केले. आभार फाऊंडेशनचे सचिव डॉ.ज्ञानेश आयतलवाड यांनी मानले.

आरोग्यविषयक वृत्त-

‘पेनकिलर’ खात असाल तर ‘हे’ नक्की वाचा

‘मेकअप’ रिमूव्हसाठी बदाम तेल उत्तम

ऑफिसमध्ये जास्त वेळ खुर्चीवर बसताय मग बदला ‘या’ सवयी

‘गोड पदार्थ’ खाल्यावर लगेच ‘पाणी’ पिण्याने बिघडते आरोग्य

‘वजन कमी’ करण्यासाठी रात्री जेवत नसाल तर होईल ‘हे’ नुकसान

अंडरआर्म्ससाठी ‘डिओ’  विकत घेताना घ्या ‘ही’ काळजी

शरीराला ऊर्जा देणारी ‘खारीक’ ‘या’ आजारांनांही करते  दूर