पद्मगंगा फाऊंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाइन – लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक कै. डॉ. गंगाधर मोरजे यांच्या स्मृतिदिनानिमित्त देण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराची घोषणा पद्मगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. धोंडीराम वाडकर यांनी केली आहे.

हमाल पंचायतीचे अध्यक्ष श्री. अविनाश घुले यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. डॉ. खासेराव शितोळे, प्राचार्य डाॅ. अनिल सहस्रबुद्धे व प्राचार्य डाॅ. अशोक शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि.९ जुलै २०१९ ला दुपारी ४ वाजता येथील मार्केट यार्डमधील हमाल पंचायतच्या सभागृहात समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

पद्मगंगा फाऊंडेशनतर्फे २०१९ साठी दिल्या जात असलेल्या लोकसाहित्य पुरस्कारासाठी प्रा.डाॅ.बाळासाहेब बळे यांच्या पारधी समाजाची लोकसंस्कृती या साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे. इतर राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार असे – वैचारिक साहित्य पुरस्कार -ॲड. डाॅ. बाळ ज. बोठे पाटील ( राजकारण आणि माध्यमे), डॉ. संजय कळमकर (कादंबरी – झुंड ), सु. द. घाटे ( कथासंग्रह – रुमणपेच), सचिन पेंढभर ( कवितासंग्रह – जेथे जगवाया उभारी), प्रा.डाॅ.देविदास शेटे (संतसाहित्य – संत तुकारामांच्या प्रभावळीतील संतांच्या रचनातील लोकबंधाचे स्वरूप) व प्रा. विठ्ठल बरसमवाड (संतसाहित्य – विठू माऊली), डॉ. बालाजी पोतुलवार ( नाटक – मराठीतील स्त्री नाटकांचा अभ्यास), डॉ. मानसी लाटकर (समीक्षा- कबीर एक द्रष्टा समाज सुधारक), श्री. अशोक कुरापाटी ( विशेष साहित्य पुरस्कार- संकल्पयोगी).

सामाजिक व शैक्षणिक कार्यगौरव पुरस्कार – रामजी देगुरे (लातूर) व व सुनील गोसावी (नगर). विशेष कार्य गौरव पुरस्कार – प्रा.डाॅ.संदिप सांगळे, पोलीस नाईक – राकेश खेडकर व अमित कुलकर्णी.

पुरस्कार निवड समितीमध्ये पत्रकार मिलिंद चवंडके, प्रा.डाॅ. सुधाकर शेलार, प्रा. डाॅ. मच्छिंद्र मालुंजकर व प्रा. अरूण नरसाळे यांनी परीक्षक म्हणून काम केले. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी नगरमधील साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फाऊंडेशनच्यावतीने डॉ. ज्ञानेश ऐतलवार, डाॅ. निर्मला पाळेकर व श्रीमती कल्याणी बरसमवाड यांनी केले आहे.

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like