आहे त्या मनुष्यबळात चांगले काम करावे : पद्मनाभन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्यास अवघे काही तास राहिले आहेत. त्यामुळे पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी सोमवारी पंधरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मीटिंग घेतली. सध्या अतिशय तोकडे मनुष्यबळ आहे. मात्र आहे त्या मनुष्यबळामध्ये चांगले काम करण्याची जबाबदारी ही आपली असून ती करुन दाखवायची आहे असे सर्व अधिकाऱ्यांना  पद्मनाभन यांनी सांगितले.

[amazon_link asins=’B077J5TTN7′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’019b0f87-9f71-11e8-824f-79d28e68f39e’]

बुधवारी सकाळी दहा वाजता ध्वजारोहण आणि त्यानंतर कंट्रोलला एक कॉल देऊन आयुक्तालयाचे कामकाज सुरु होणार आहे. त्यामुळे आज पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, नम्रता पाटील, विनायक ढाकणे, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांच्यासह पोलीस आयुक्तालयात समाविष्ट असलेल्या पोलीस ठाण्याच्या निरिक्षकांची मिटिंग घेतली. यावेळी पोलीस ठाण्यातील गुन्हेगारी, हद्द, हद्दीत समाविष्ट परिसर, कंपन्या याची माहिती घेण्यात आली. महत्वाचे म्हणजे पोलीस ठाण्यात असलेले अधिकारी आणि कर्मचारी संख्या याची माहिती घेवून आहे त्या मनुष्यबळात कश्या प्रकारे चांगले काम करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी ४ हजार ८४० पदांची आवश्यकता आहे. त्यापैकी पोलीस आयुक्त, पुणे शहर आणि पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्याकडून दोन हजार २०७ पदे वर्ग करण्यात येणार आहेत. तर उर्वरित दोन हजार ६३३ पदे तीन टप्प्यात भरली जाणार आहेत. त्यापैकी ६० टक्के पदे पहिल्या,२० टक्के दुस-या आणि उर्वरित २० टक्के तिसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया तसेच वर्ग करण्याबाबत पोलीस महासंचालकांसोबत १६ ऑगस्ट रोजी बैठक होणार असल्याचेही सांगण्यात आले.

सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळातून वाहतूक शाखा, गुन्हे शाखा आणि अन्य विविध शाखा तयार करून मनुष्यबळ पुरवावे लागणार आहे. थोडे मनुष्यबळ सर्व शाखांना पुरविणे ही मोठी तारेवरची कसरत आहे. मनुष्यबळासोबत विविध शाखांसाठी इमारती, साहित्य व साधने यांची देखील जमवाजमव करण्याचे काम सुरु आहे. मनुष्य बळा एवढेच साहित्य व साधनांची उपलब्धता देखील तेवढीच महत्वाची आहे. शून्यातून सर्व उभारणी करायची असून त्यातही उत्तम ध्येय गाठायचे आहे, असा विश्वास देखील पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी व्यक्त केला.