Padmavati Pune Crime News | पुणे : कोयत्याने वार करुन पसरवली दहशत, तडीपार गुन्हेगारासह तिघांना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Padmavati Pune Crime News | पुणे शहरामध्ये कोयत्याचा धाक (Fear Of Koyta) दाखवून दहशत पसरवण्याच्या घटना घडत आहेत. बुधवारी (दि.15) रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एका तडीपार गुन्हेगाराने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून कोयत्याने वार करुन परिसरात दहशत पसरवली. ही घटना तळजाई वसाहत, पद्मावती येथे घडली असून सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) तीन जणांना अटक केली आहे.

याबाबत गुनाजी आण्णा वाघमारे (वय-43 रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन राजू संजय लोंडे उर्फ डड्या (वय-26), राज रवि वाघमारे उर्फ हीरव्या (वय-18 रा. दोघे रा. तळजाई वसाहत, पद्मावती, पुणे), सुशील गोरे (वय-18) यांच्यावर आयपीसी 452, 324, 504, 506, 34सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. आरोपी राजू लोंडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal On Police Record) असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात 13 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर राज वाघमारे याच्यावर 5 गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आले होते. तसेच एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या वस्तीत आले.
त्यांनी काहीही कारण नसताना फिर्य़ादी यांच्या घरात आले. त्यांनी फिर्य़ादी व त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांच्यावर कोयत्याने वार करुन जखमी केले. त्यावेळी वस्तीमधील लोक जमा झाले असता आरोपींनी
कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवली. तसेच आमची पोलिसांकडे तक्रार केली तर वाघमारे कुटुंबाला जगू
देणार नाही अशी धमकी देऊन हातातील कोयते हवेत फिरवून निघून गेले.
घटनेची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Slams Praful Patel | शिवरायांचा जिरेटोप घालून मोदींचा सत्कार, शरद पवारांनी प्रफुल पटेलांना फटकारले, लाचारी करावी, पण त्यालाही मर्यादा असते

Bhor Pune Crime News | पुणे : भोर तालुक्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून ग्रामस्थांवर गोळीबार (Video)

Pune Crime News | पुणे : शहरात खुनाच्या दोन घटना, दारुसाठी पैसे न दिल्याने मुलासह नातवाकडून महिलेचा खून