हाथरस प्रकरणामुळं दुखावलेल्या ‘या’ समाजाच्या 50 कुटुंबांनी स्विकारला बौध्द धर्म

गाझियाबाद : पोलीसनामा ऑनलाईन –   संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या हाथरस सामुहिक बलात्कार प्रकरणाची (hathras-case) सुनावणी सध्या सुरु आहे. या घटनेचे तीव्र सामाजिक पडसाद उत्तर प्रदेशात दिसून येत आहेत. गाझियाबादमधल्या करहेडामधल्या वाल्मिकी समाजातल्या 50 कुटुंबांतील एकूण 236 जणांनी (50 families have embraced Buddhism) बौध्द धर्म स्वीकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतूू राजरत्न आंबेडकर यांच्या उपस्थितीत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली. या कुटुंबांना भारतीय बौध्द महासभेकडून एक प्रमाणपत्र देण्यात आले आहे. बौध्द धर्म स्वीकारणा-यामध्ये महिला आणि बालकांचाही समावेश आहे

हाथरस प्रकरणामुळे अतिशय दुःख झाल्याची भावना बौध्द धर्म स्वीकारलेल्या वाल्मिकी कुटुंबानी व्यक्त केली आहे. आमच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. आर्थिक विवेंचनेचा सामना करत असूनही प्रकरणाची सुनावणी घेतली जात नाही, अशी व्यथा या कुटुंबांनी मांडली आहे. आमच्या गावातील 50 कुटुंबातील 236 जणांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतल्याचे बीर सिंह यांनी सांगितले. बौध्द धर्म स्वीकारल्यानंतर समाजसेवा करा, असे त्यांनी सांगितल, अशी माहिती सिंह यांनी दिली. 14 सप्टेंबरला हाथरसमधील बुलगढी गावातल्या वाल्मिकी समाजाच्या एका मुलीवर सामुहिक बलात्कार झाला होता. या मुलीची जीभही कापून टाकण्यात आली. रुग्णालयात कित्येक दिवस पीडीतेवर उपचार सुरु होते. मात्र तिची झुंज अपय़शी ठरली. यानंतर वाल्मिकी समाजात आक्रोश पहायला मिळाला. सध्या सीबीआयकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चारही आरोपी अलिगढ येथील तुरुंगात आहेत.

You might also like