पैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (धर्मा मैड) –   सोनार समाज बांधवांच्या वतीने पैठण येथे श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार मूर्ती व शिखर प्राणप्रतिष्ठा सोहळा आयोजित करण्यात आला आहे .

यानिमित्ताने संत नरहरी महाराज मंदिर गावातील एकनाथ महाराज मंदिरासमोर श्रीक्षेत्र पैठण येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

१२ जून २०१९ सकाळी ९ वाजता प.पू प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते कलशारोहन शिखर प्रतिष्ठा पुर्णाहुती महाआरती ना सांगता होणार आहे. या कार्यक्रम प्रसंगी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे,  केंद्रीय राज्य मंत्री खा. रावसाहेब दानवे,  आमदार संदिपान भुमरे,  आयएएस अधिकारी भाग्यश्रीताई विसपुते,  उपजिल्हाधिकारी अंजलीताई धानोरकर,  यांच्यासह विविध मान्यवर व ज्येष्ठ समाज बांधव प्रमुख्याने उपस्थित राहणार आहे .

तरी सर्व सोनार समाज बांधवांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत नरहरी सोनार मंदिर संस्थानचे अध्यक्ष राम लोळगे, पैठण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुरज लोळगे,  लाड सोनार महाअधिवेशन सुकाणू समिती सदस्य कृष्णा लोळगे,  चंद्रकांत अंबिलवादे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त  (www.arogyanama.com)

 ‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

झोपेत असताना कुणी छातीवर बसल्यासारखे वाटलेय का ?

 रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात

 

Loading...
You might also like