Indian Air Strike: ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री म्हणते यापेक्षा वाईट काहीही नाही!

मुंबई : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये मंगळवारी पहाटे हवाई हल्ला करत जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उध्वस्त केल. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. भारतीय नागरिकांनी ,राजकीय नेत्यांनी ,खेळाडूंनी आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी ट्विट करत भारतीय हवाई दलाचे कौतुक केले. तर दुसरीकडे पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान, मारवा हौसेन यांनी युद्धाचं समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे.

शाहरुख खान सोबत रईस चित्रपटात झळकलेल्या माहीर खानने ट्विट करत म्हटलं ,

‘युद्धाचं समर्थन करणं आणि युद्धासाठी प्रोत्साहन देणं यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही .लोकांना सद्बुद्धी देवो. पाकिस्तान झिंदाबाद ‘
https://twitter.com/TheMahiraKhan/status/1100387358573248513
तर दुसरीकडे ‘सनम तेरी कसम’ या बॉलिवूड चित्रपटात झळकलेली अभिनेत्री मारवा हौसेन हिनं शांततेचं आवाहन केलं आहे.
‘युद्धात कुणीच विजेता नसतो. ही वेळ धैर्य, संयम आणि माणुसकी पाळण्याची आहे.लोकांच्या भावना भडकवणं माध्यमांनी थांबवलं पाहिजे. आपण शांततेसाठी नेहमीच प्रार्थना केली पाहिजे. आपले शब्द हे कौतुकासाठी असले पाहिजे वाईटासाठी नाही
,असं मारवानं म्हटलं आहे.
https://twitter.com/MawraHocane/status/1100366291293081600

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात बंदी आणली होती . तसेच पाकिस्तानी गायकांवर कारवाई करत त्यांच्या गाण्यांवर बंदी घातली . भारतीय हवाई दलानं मंगळवारी पहाटे जैश-ए-महम्मदच्या तळावर हवाई हल्ले करीत दहशतवादी तळ उध्वस्त केले.‘ मिराज २०००’ विमानांनी ही कारवाई पार पाडली. या हल्ल्यात ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचं म्हटलं जात आहे.

You might also like