कलम 370 वरून पाकिस्ताननं सुरवातीला ट्विटरवर दाखवला ‘माज’, आता करतोय ‘दया’याचना !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे. याप्रकरणी त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे दरवाजेही ठोठावले. मात्र सुरक्षा परिषदेने एकांगी कारवाईस नकार दिला. जागतिक पातळीवर पाकिस्तान एकटा पडला. या गोष्टीमुळे पाकिस्तान इतका संतापला होता की, पाकिस्तानकडून ट्विटरवरुन आपला राग व्यक्त करणे सुरु केले होते.

कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरवर बनावट बातम्या पसरविण्याचे तसेच पाकिस्तानच्या वतीने ट्विटरवर खोटी छायाचित्रे पसरवल्याची प्रकरणे समोर आली आहेत. पाकिस्तानची 200 हून अधिक ट्विटर अकाउंट हिंसेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली बंद करण्यात आली होती. आता तीच खाती पुन्हा सुरु करण्यासाठी पाकिस्तान विनंती करत आहे.

ट्विटरने बंद केलेली 200 हून अधिक खाती काश्मीरबद्दल खोटी बातमी आणि अफवा पसरविणार्‍या सर्व पाकिस्तानी लोकांची होती. ह्या कारवाईवर पाकिस्तानने ट्विटरवर पक्षपात केल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी ट्विटरला ही बंद केलेली सामाजिक खाती पुन्हा कार्यान्वित करण्याची विनंती केली आहे.

370 पर पहले पाकिस्तान ने ट्विटर को दिखाई हेकड़ी, अब लगा रहा गुहार

‘पाकिस्तान एक्स्प्रेस ट्रिब्यून’ या पाकिस्तानी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणाने (पीटीए) ट्विटरवर या संदर्भात संपर्क साधला असून पाकिस्तान वापरकर्त्यांचे निलंबित खाते सक्रिय करण्याची विनंती केली आहे. पीटीएने ट्विटरवर आरोप केला आहे की, पाकिस्तानी लोकांची खाती बंद करणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात आहे आणि ट्विटरच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे.

पाकिस्तानच्या या आरोपांना उत्तर देताना ट्विटरने म्हटले आहे की, सर्व वापरकर्त्यांसाठी कंपनीचे समान धोरण आहे आणि त्याच न्यायाने त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. कोणतीही राजकीय विचारसरणी आणि कोणताही देश असो, सर्व लोकांसाठी एकसारखे धोरण आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तत्त्वांवर अवलंबून आहे. ट्विटरची समीक्षक टीम कोणती सामग्री नियमांचे उल्लंघन करीत आहे हे शोधून काढते.