पाकिस्तानचा नवा ‘डाव’ ! ऑक्टोबरमध्ये LoC वर 4000 दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूएन जनरल असेंब्ली (UNGA) ची बैठक संपल्यानंतर पाकिस्तान नियंत्रण रेषेवर (LOC) काही मोठ्या कारवाया करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. नागरिकांना यासाठी ढाल बनवले जाईल अशी माहिती मिळाल्याने गुप्तचर यंत्रणांनी LOC जवळील सुरक्षा दलांना सतर्क केले आहे.

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी सैन्य आणि ‘जमात-उल-हदीस’ यांनी नियंत्रण रेषेच्या उल्लंघनासाठी ३ हजार ते ४ हजार तरुणांना तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांना एक महिन्यासाठी प्रशिक्षण दिले गेले आहे. जमात-उल-हदीस ही २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदची दहशतवादी संघटना आहे.

सूत्रांनी सांगितले की, या अतिरेकी ट्रेंडमध्ये जेकेएलएफ (आझादी) चे काही तरुण सदस्य पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये (POK) सक्रिय आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ते घुसखोरी करू शकतील. या प्रशिक्षणाचे उद्दीष्ट म्हणजे तरुणांचे माइंडवॉश करणे आणि त्यांना नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात पाठविणे हे आहे.

भारतावर करणार मानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप :
पाकिस्तान ही योजना अशा प्रकारे अमलात आणण्याच्या प्रक्रियेत आहे की जर भारतीय सुरक्षा दलाने प्रत्युत्तर दिले तर पाकिस्तान नागरिकांना मानवी हक्कांचे उल्लंघन करण्यासारखा कांगावा जगासमोर मांडू शकेल. या व्यतिरिक्त पाकिस्तानी लष्कर या जमावासमवेत आपले BAT (बॉर्डर अ‍ॅक्शन टीम) सदस्य पाठवित आहे. हे सर्व नियंत्रण रेषांचे उल्लंघन करण्यात यशस्वी ठरल्यास मोठा घातपात होऊ शकतो.

या ठिकाणांवरून होऊ शकते घुसखोरी :
नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तान लष्कर आणि दहशतवाद्यांनी कमीतकमी अशी ३१ ठिकाणे शोधली आहेत जिथून घुसखोरीचे प्रयत्न केले जाऊ शकतात. भारतीय सुरक्षा एजन्सीज पाकिस्तानच्या घातपाताचा कारवाया थांबवण्यासाठी रात्रंदिवस सतर्कतेने प्रयत्न करत आहेत. या यादीमध्ये आधी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी पोस्ट आणि त्यानंतर त्यालगतच्या भारतीय क्षेत्राचे नाव देण्यात आले आहे. आम्ही याठिकाणी या ठिकाणांची यादी देत आहोत –

१. पी पी नाला – पुंछ
२. सोनार – मच्छल
३. हाथलंगा- रामपुर
४. आठमुकाम – केरन
५. दुधिनाल – केरन
६. गिद्दर – उरी
७. गुंडगराह – उरी
८. शार्दी – मच्छल
९. लंजोट – बीजी (बालाघाट)
१०. मोहरा – बीजी (बालाघाट)
११. कासिम – मच्छल
१२. कोपरा – सुजियान
१३. पीपी बर्बाद – बीजी (बालाघाट)
१४. पोलास – पुंछ
१५. तेजियान – बीजी (बालाघाट)
१६. मोची मोहरा – पुंछ
१७. मादरपुर – केजी (कृष्णा घाटी)
१८. बट्टल मजूरा – केजी (कृष्णा घाटी)
१९. गोई – केजी (कृष्णा घाटी)
२०. ठंडीकस्सी – बीजी (बालाघाट)
२१. जनवई – मच्छल
२२. हरमारगी – मच्छल
२३. छम्म – उरी
२४. कठार – केजी (कृष्णा घाटी)
२५. बोखरा – उरी
२६. पछीबान – उरी
२७. रोजा – केजी (कृष्णा घाटी)
२८. पी पी ट्विन – केजी (कृष्णा घाटी)
२९. पीएल मजार – बीजी (बालाघाट)
३०. नारकोट – नौगाम
३१. ग्रीन बम्प – पुंछ

जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तैयबाही सक्रिय :
दहशतवाद्यांना लपवण्यासाठी पाकिस्तानी लष्कर नियंत्रण रेषेजवळील आपले संरक्षण बंकर वापरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर सूत्रांनी सांगितले की, जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांसमवेत पाकिस्तान सैन्याची टीम येत्या काही दिवसांत नियंत्रण रेषेला लागून असलेल्या भागात मोठा घातपात करण्याचा प्रयत्न करू शकेल. घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याकडून जोरदार गोळीबार केला जाणे शक्य आहे. यासाठी पीर पंजाल रेंजच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी लाँच पॅड वापरले जाऊ शकतात.