ICC World Cup 2019 : ‘जन-गण-मन’ म्हणून पाकिस्तानी फॅन्सने केलं टीम इंडियाला ‘प्रोत्साहित’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विश्वचषक स्पर्धेतील आज होत असलेल्या भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान पाकिस्तानी प्रेक्षकांनी भारताचे राष्ट्रगीत गाऊन भारताच्या टीमला सपोर्ट दिला. तसेच भारताच्या विजयासाठी प्रार्थना केली. कारण भारताच्या विजयाने पाकिस्तानच्या सेमी फायनलचा मार्ग मोकळा होणार आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन ३३८ धावांचे आव्हान दिले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर देखील पाकिस्तानी फॅन्स टीम इंडीयाला सपोर्ट करत आहेत. सामन्या अगोदर इंग्लंडच्या माजी कर्णधार नासिर हुसैन याने पाकिस्तानी फॅन्सला तुम्ही कोणाला सपोर्ट करणार असे विचारले होते. त्यावर उत्तर देताना एका पाकिस्तानी फॅन नासिर अलीने ट्विटरवर भारताचे राष्ट्रगीत गाऊन आपली प्रतिक्रीया दिली. तर एकाने आम्ही भारतीय वायु दलाचे विंग कमांडर अभिनंदनला चहा पाजतो. विराट आमच्या मनावर अधिराज्य गाजवतो असे म्हटले.

 

पाकिस्तान संघाने आत्तापर्य़ंत आठ सामने खेळले आहेत. त्यामध्ये चार सामन्यात विजय मिळाली आहे तीन सामन्यात पराभव पत्कारावा लागला तर एक सामना रद्द झाला होता. त्यामुळे त्यांच्याकडे ९ गुण असून गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना बांग्लादेश बरोबर होणार असून हा सामना जिंकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्लंडचा पराभव व्हावा आणि टीम इंडीयाचा विजय व्हावा अशी प्रार्थना करावी लागणार आहे. भारताने जर इंग्लंडला पराभूत केले आणि पाकिस्तानने दोन सामने जिंकले तर सेमीफायनलमध्ये भारत – पाकिस्तान पोहचू शकतात.

 

शरीरा तील विषारी घटक बाहेर टाकणे आवश्यक, करा हे उपाय

शारीरीक दुर्बलता दूर करण्यासाठी पुरुषांनी कांद्या चा असा करावा उपयोग

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

कडुबाई खरात यांच्यासह अनेक मातंग बांधव घेणार धम्मदीक्षा

बुद्धविहार तोडल्याच्या निषेधार्थ मुंडन आंदोलन