PAK ने कितीही ‘दया’याचना केल्या तरी चीन ‘मुग’ गिळून गप्प राहणार, ‘या’ ३ गोष्टींमुळे चीनचे ‘हात’ दगडाखाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कलम ३७० रद्द केल्यानंतर शेजारच्या पाकिस्तानची चांगलीच आगपाखड झाली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागण्यासाठी सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने पाकिस्तानचे परराष्ट्रीय मंत्री शहा महमूद कुरैशी यांनी चीन चा दौरा केला आहे. पाकिस्तानचे म्हणणे आहे की चीनच्या मदतीने काश्मीरच्या जनतेचा आवाज जगासमोर मांडावर आहे.

भारताचे परराष्ट्रीय मंत्री एस जयशंकर हे सुद्धा तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. इतर देशांनी भारताच्या या निर्णयावर भाष्य करणे टाळले आहे. मात्र चीन ने यावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र चीनही यावर जास्त मोठी भूमिका घेऊ शकणार नाही. कारण चीनचे हात दगडाखाली अडकलेले आहेत. या कारणामुळे चीन आंतरराष्ट्रीय पातळीवर गोत्यात येऊ शकतो.

हांगकांगमधील प्रदर्शन

हॉंगकॉंगमध्ये प्रत्यर्पण विधेयका विरोधात जोरदार प्रदर्शन सुरु आहे. या विधेयकामध्ये नियम आहे की, आतंकवाद्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी चीनमध्ये प्रत्यार्पित केले जाईल. या विधेयकाचा हॉंगकॉंगमध्ये जोरदार विरोध सुरु आहे. जर चीनने पाकिस्तानला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताविरोधात काही बोलला तर भारत सुद्धा हॉंगकॉंगच्या समर्थनार्थ चीन विरोधात बोलले.

उइगर मुस्लिम

चीनच्या शिनजियांग १० लाख उइगर मुस्लिम समाजाबाबत चिनी कम्यूनिस्ट शासनाच दमन मानवाधिकार हनन केल्याचा एक महत्वाचा मुद्धा बनला आहे. अनेक दुसऱ्या देशांनी चीनच्या या निर्णयाचे खंडन केले आहे आणि मानवाधिकार संगठन एमनेस्टी इंटरनेशनल नुसार चिनी सरकार तेथील मुसलमानांना धार्मिक मतांना मानले नाही. तर दबाव टाकत आहे आणि मुसलमान समाजाचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे जर चीनने पाकिस्तानच्या बाजूने भारताविरोधात काही बापलायचे ठरवले. तर भारत चीन विरोधात उइगर मुस्लिम मुद्दा काढून आंतराष्ट्रीय पातळीवर चीनची इज्जत काढू शकतो.

तिब्बत मुद्दा

तिब्बतवर भलेही चीनचे राज्य असो. परंतु अनेकदा तिब्बतच्या स्वातंत्र्यासंबंधीची मागणी केली गेली आहे. भारताने ज्यावेळी ३७० कलम रद्द केलं. त्यावेळी तिब्बतने हा त्यांचा आंतरिक प्रश्न आहे असे म्हणून यावर भाष्य करणे टाळले होते. एवढेच नाही तर त्यांच्या राष्ट्रपतींच्या भारत सरकारने तिब्बतच्या स्वातंत्र्याबाबतही विचार करावा असे म्हंटले होते. भारत मात्र तिब्बतवार टिपण्णी करण्याआधी चीनचा विचार करते. मात्र चीनने जर भारताविरोधात पवित्र घेतला. तर भारतही हा मुद्दा उचलल्याशिवाय राहणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like