PM मोदींच्या जन्म दिवसाबद्दल ‘वादग्रस्त’ ट्विट करणाऱ्या PAK च्या मंत्र्याला पाकिस्तानी नागरिकांनीच सुनावलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसानिमित्त जगभरातून मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा दिल्या जात आहेत. ट्विटरवर तर जगभरातून दुसऱ्या क्रमांकावर मोदींचा वाढदिवस ट्रेंडिंगमध्ये आहे. पाकिस्तानत वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले मंत्री फवाद हुसेन यांनी मोदींबाबत वादग्रस्त ट्विट केले आहे.

एका पंतप्रधानावर केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे पाकिस्तानातूनच फवाद यांना टीकेला सामोरं जावं लागत आहे. फवाद यांनी आजचा दिवस आम्हाला गर्भनिरोधाचे महत्त्व काय याची आठवण करून देतो असं ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये फवाद यांनी #modibirthday असा हॅशटॅग वापरला आहे.

https://twitter.com/fawadchaudhry/status/1173823326067838977

फवाद खान यांनी चांद्रयान २ च्या वेळेस सुद्धा वादग्रस्त ट्विट केले होते त्यावेळी भारताला उद्देशून ते म्हणाले होते की, जे काम येत नाही ते करू नहे. त्यावेळी देखील फवाद खान यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते.

मात्र या ट्विटमुळे पाकिस्तानातूनच त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. नेटकऱ्यांनी तर त्यांचे मिम्स बनवूनही सोशल मीडियावर टाकायला सुरुवात केली आहे. एकाने तर तुम्हाला सकाळी सकाळी काही कामधंदा नाही का ? कामावर जा, असे म्हणत रिट्विट केले आहे.

You might also like