सीमेवर पाकिस्ताने केली सैन्यात वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत पाकिस्तान संबंधात कसलीच सुधारणा होताना दिसत नाही. उलट दोन्ही देशात तणावाची स्थिती अधिकच गडद होताना दिसते आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्या पासून या दोन्ही देशातील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानने सीमेवर सैन्य वाढवले आहे. तसेच शस्त्रसाठा देखील वाढवला आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या माहिती नुसार पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवरील सैन्य कमी करून भारत-पाक सीमेवरील सैन्य वाढवले आहे. भारत पाक सीमेवर संवेदनशील असणाऱ्या युद्ध चौक्यांवर पाकिस्तानने आपले सैन्य वाढवायला सुरुवात केली आहे.  सध्या भारतीय सीमेवर पाकिस्तानकडून सामान्य नागरिकांना लक्ष बनवले जाते आहे. याच मुद्दयांवर भारताने काल पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या सामान्य नागरिकांना लक्ष करून पाकिस्ताने गोळीबार केल्यास याचे पाकिस्तानला वाईट परिणाम भोगावे लागतील असे भारतीय लष्कराने म्हणले आहे. मागील काही दिवसापासून पाकिस्तान सीमेवर पाक लष्कर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. यात भारताच्या काही सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला आहे.

दरम्यान भारत आणि पाकिस्तान देशाच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी  हॉटलाईनव्दारे चर्चा झाली. या संवाद भारताने आपल्या सामान्य नागरिकांना पाक लष्कराने लक्ष करू नये असे कडक शब्दात सुनावले आहे. तसेच पाकिस्तान कडून गोळीबार सुरु राहिल्यास याचे पाकिस्तानवर गंभीर परिणाम होतील असे देखील सुनावण्यात आले आहे. या संवादानंतर आता भारत-पाकिस्तान सीमेवर परिस्थिती नियंत्रणात आली आहे.