दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी साथ देण्याचे पाकिस्तानच्या ‘या’ माजी कर्णधाराचे भारतीयांना आवाहन

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारत – पाकिस्तानचे संबंध सध्या खूपच ताणलेले आहेत. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रमने दोन देशांतील परिस्थितीवर महत्त्वाचं विधान केलं आहे. भारत व पाकिस्तानचा शत्रू दहशतवाद असून आपण मिळून दहशतवादाविरुद्ध लढूया, असे आवाहन त्याने भारतीयांना केले आहे.
वसीम अक्रम याने ट्विटमध्ये म्हंटल आहे की, ”भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे शत्रू नाहीत. भारत व पाकिस्तान यांचा शत्रू एकच आहे आणि हे समजण्यासाठी आपण आणखी किती दिवस एकमेकांचे रक्त वाहणार आहोत ? दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन लढायला हवं.”
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला भारतानं एअर स्ट्राइक करून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. वायुसेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर १००० हजार किलोचा बॉम्बचा हल्ला करत उद्ध्वस्त केला. सुमारे ३५० दहशतवादी या हल्ल्यात मारले गेले. यानंतर पाकिस्तानने युद्धाची धमकी दिली व बुधवारी काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्नही केला. तो भारताने मोडून काढल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नरमाईची भूमिका घेत चर्चेची तयारी दाखविली आहे. आज, गुरुवारी सकाळी पुंछ जिल्ह्यातील कृष्‍णा घाटी सेक्‍टरमध्ये पाकिस्‍तानकडून पुन्हा शस्‍त्र संधीचे उल्‍लघन करण्यात आले. याला भारतीय जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
भारताची कारवाई योग्यच –
पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवरुन अमेरिकेशिवाय ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्ससारखे देश भारताच्या बाजूने उभे राहिल्याचे दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी त्वरीत पाऊल उचलण्याचे अपील केले आहे. बुधवारी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॅम्पिओ यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवर सुरू असलेले दहशतवादी तळ नष्ट करण्यास सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर 

हेलिकॉप्टर दुर्घटनेत नाशिकचा सुपुत्र शहीद 

विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य 

‘त्या’मुळे आजच गुंडाळणार अर्थसंकल्पीय अधिवेशन ?