Coronavirus : PAK चे पंतप्रधान इमरान खान यांना कोरोना ? ब्रिटिश TV चॅनलनं दिली बातमी

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  पाकिस्तानात तहरीक -ए-इंसाफचे नेते डॉ. शहबाज गुल यांनी सांगितले की ब्रिटिश टीव्ही चॅनलने चुकून पंतप्रधान इमरान खान हे कोरोना व्हायरसमुळे संक्रमित झाल्याची बातमी दिली होती.

ब्रिटिश पीएम बोरिस जॉनसन यांच्या ऐवजी चुकून इमरान खान यांचे नाव –

डेली पाकिस्तानच्या वृत्तानुसार डॉ. शहबाज गुलने आपल्या एका ट्विटमध्ये म्हणले की ब्रिटिश टीव्हीद्वारे आपल्या देशातील पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोना झाल्याची बातमी दिली होती परंतु त्यांनी चुकून आपल्या पंतप्रधानांच्या नावाऐवजी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे नाव लिहिले. ते पुढे म्हणाले, ईश्वराच्या कृपेने इमरान खान एकदम ठीक आहेत आणि काही वेळापूर्वीच कार्यालयातून घरी गेले आहेत.

ब्रिटन पंतप्रधान बोरिस यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे ते क्वारंटाइन देखील झाले आहेत. त्यांनी एका व्हिडिओ मेसेजमधून सांगितले की ते व्हिडिओ कॉन्फ्रेन्सद्वारे कोरोनाच्या विरोधात राष्ट्रीय युद्धाचे ते नेतृत्व करतील. चीनमधून कोरोना पसरण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर एक एक करुन जगातील जवळपास सर्वच देश कोरोनाच्या विळख्यात आले. पाकिस्तानात देखील कोरोना पसरला आहे.