काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानचं जगाला ‘आव्हान’, ‘हिम्मत’ असेल तर भारताला ‘रोखून’ दाखवा !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारतीय सरकारने जम्मू-काश्मिरबाबत मोठा निर्णय घेत कलम ३७० रद्द केले. त्यानंतर पाकिस्तानमधील वातावरण दिवसेंदिवस बिघडताना दिसत आहे. पाकिस्तान काश्मिर मुद्यावर रोज ताजी निवेदने देत आहे. पाकिस्तानला युद्ध नको आहे पण जर भारताने युद्ध लादले तर पाकिस्तान योग्य उत्तर दिले जाईल, असं पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काश्मीरमधील संभाव्य हत्याकांड रोखण्याचे आंतरराष्ट्रीय समुदायात नैतिक धैर्य आहे का ? असा सवालही इम्रान खान यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून केला. त्यानंतर इम्रान खान यांना दहशतवादी गटांचा वापर भारतविरूद्ध करण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्यांनी नकार देत सांगितले, की काश्मीरबाबतच्या भारताच्या निर्णयाच्या विरोधात दहशतवादी गटांचे समर्थन करणार नाही. काश्मीरपासून जगाचे लक्ष हटवण्यासाठी भारत पुलवामासारखी परिस्थिती निर्माण करू शकतो. हा धोका खूप वास्तविक आहे. अशा परिस्थितीत आपल्याला उत्तर द्यावे लागेल, असंही त्यांनी सांगितले.

काश्मिर प्रश्नावर अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावामुळे भारताने घाईने कलम ३७० हटविण्याचा निर्णय घेतल्याची टीकाही त्यांनी केली. भारताशी संबंध चांगले करण्यासाठी, सुधरवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण मोदी सरकारने परिस्थितीचा फायदा घेतल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. मोदींनी लोकसभा निवडणुकींसाठी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत वापर केला. तसंच मोदी हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. त्यांना असा भारत हवा आहे की ज्यामध्ये काश्मीरमध्ये फक्त हिंदू आणि हत्याकांड केले जाऊ शकतात, अशी गंभीर टीका त्यांनी केली आहे.

तसंच, पाकिस्तानवर हे एक प्रकारचे संटक असून पाकिस्तान सध्या मदतीसाठी इतर देशांनाही आवाहन करत आहे. भाजप हा मनमानी कारभार करत राहील आणि आपण शांततेत पाहणार आहोत का किंवा भाजपला म्हणजे मोदींना थांबविण्याचे नैतिक धैर्य जागाकडे नाही का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like