UN : PAK च्या महिला अधिकारी मलिहा यांच्यावर ‘भडकलं’ पाकिस्तान सरकार, 20 वर्ष काय केलं याबाबत विचारलं

न्युयॉर्क : वृत्तसंस्था – संयुक्त राष्ट्रातील प्रतिनीधी मलीहा लोधी यांना न्युयॉर्कमध्ये मोठ्या अपमान सहन करावा लागला आहे. न्युयॉर्कमधील एका कार्यक्रमावेळी एका व्यक्तीने आपण पाकिस्तानी असल्याचा दावा करत लोधी यांना खूप ऐकवले आहे. जेव्हा लोधी या माध्यमांशी बोलत होत्या, तेव्हाच या व्यक्तीने मध्यस्ती करत त्यांना काही प्रश्न केले. याचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे.

मुलीहा जेव्हा माध्यमांच्या प्रश्नांची उत्तरे देत होती. तेव्हा त्यांच्याकडे या व्यक्तीने मध्ये येत तुमच्या गप्पा अजून संपल्या नाहीत का, माझ्याकडे तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तुम्ही नक्की काय करत आहात ?, तुम्ही मागील १०-१५ वर्षांपासून काय करत आहात ?, असा सवाल केले. तसंच त्यानंतर या व्यक्तीने त्यांच्यावर पैसे चोरल्याचे आरोपही केले. तेव्हा लोधी यांनी त्या व्यक्तीला फटकारले. प्रश्न विचारण्याची ही पद्धत नव्हे. अशा पद्धतीने प्रश्न केल्यास त्याची उत्तरे देणार नाही, असंही एका अधिकाऱ्याने सांगितले.

त्यानंतर मात्र या व्यक्तीने आपण पाकिस्तानी नागरिक आहोत. त्यामुळे लोधींना प्रश्न विचारण्याचा मला पूर्ण अधिकार आहे, असं म्हटलं. जेव्हा एका अधिकाऱ्याने त्याला रोखले, तेव्हा याव्यक्तीने त्यांवर आता लोक तुमच्यापर्यंत अशाच प्रकारे पोहोचतील. आता तुम्हाला कोणी सोडणार नाहीये. तुम्ही २० वर्षांपासून लोकांचे पैसे चोरले आहेत. तुम्ही लोक चोर आहात, तुम्ही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्यास योग्य नाही, असे आरोप या व्यक्तीने केले आहेत. दोघांमध्ये झालेल्या वादानंतर लोधी यांनी तेथे न थांबण्याचा निर्णय घेत तेथून काढतापाय घेतला.

दरम्यान, त्यांच्या या वादाचा व्हीडिओ व्हायरल होत आहे. बऱ्याच पाकिस्तानी लोकांनी या व्यक्तीचे समर्थन केले आहे. तसंच पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या क्षमतेवर प्रश्न विचारत आहेत. तसंच पाकिस्तानी लष्कराला असे प्रश्न केले पाहिजेत.