PAK Vs SL : कराची स्टेडियमची लाईट्स गेल्यानं ‘गोत्यात’ आलं पाकिस्तान, लोकांनी लिहिलं यांना काश्मीर हवंय…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमध्ये दहा वर्षानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. मात्र या सामन्यात मोठ्या प्रमाणावर फ्लडलाईट्सचा प्रॉब्लेम आला. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला ट्रोल केले जात आहे. कराचीतील नॅशनल स्टेडिअमवर झालेल्या या सामन्यात या घटनेमुळे पाकिस्तानचा कर्णधार  सरफराज अहमद देखील मोठ्या प्रमाणात रागात दिसला.

सामना सुरु झाल्यानंतर पाकिस्तानची फलंदाजी व्यवस्थित पार पडली. मात्र श्रीलंकेच्या संघाची फलंदाजीची वेळ आली असता संपूर्ण मैदानातील लाईट्स बंद पडल्या. जवळपास अर्धा तास लाईट्सचा प्रॉब्लेम सोडवता आला नाही. त्यामुळे खेळाडूंसह स्पर्धक देखील मोठ्या प्रमाणात नाराज झाले. त्यानंतर या घटनेचा सोशल मीडियावरून चांगलाच समाचार घेण्यात आला.

काही लोकांनी मैदानाच्या मेंटेनंसवर प्रश्नचिन्ह उपस्तिथ केले असून काही लोकांनी रिकामे मैदान आणि बंद पडलेल्या लाईट्स, फँटॅस्टिक असे म्हणत पाकिस्तान बोर्डाला चांगलेच फैलावर घेतले. तर काहीजणांनी म्हटले कि, यांच्याकडे मैदानात लाईट लावायला पैसे नाही आणि काश्मीर हवा.

दरम्यान,  हा सामना पाकिस्तानने 67 धावांनी जिंकत अनेक वर्षांनी मायभूमीवर विजय साकार केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 305 धावा केल्या होत्या.

Visit : Policenama.com