PAK vs ENG | पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; इंग्लंडने हातातील सामना घेतला हिरावून

पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाकिस्तान आणि इंग्लंड (PAK vs ENG) यांच्यात आज पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानच्या हातातील सामना हिसकावून घेऊन पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. इंग्लंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान हा सामना (PAK vs ENG) सहज जिंकेल, असे वाटत होते. पण पाकिस्तानने पाच धावांत चार विकेट्स गमावल्या आणि त्यांचा या सामन्यात पराभव झाला. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

 

इंग्लंडने पाकिस्तानपुढे 343 धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. पाचव्या दिवशी पाकिस्तानच्या संघाला जास्त धावा होतील, असे वाटत नव्हते, पण रावळपिंडीची खेळपट्टी ही पाटा असल्यामुळे पाकिस्तानला धावा करणे सोप्पे गेले. त्यामुळे पाकिस्तानने सामन्याच्या पाचव्या दिवशी दमदार फलंदाजी करत हा सामना आपल्या बाजूने झुकवला. (PAK vs ENG)

 

यावेळी पाकिस्तानची फलंदाजी बघून पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते.
मात्र, बोलतात ना क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत काय घडेल ते सांगता येत नाही.
इंग्लडच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करत हा सामना आपल्या बाजूने झुकवला आणि सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.
पाकिस्तानच्या चार विकेट्स झटपट गेल्यामुळे पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला.

 

Web Title :- PAK vs ENG | england beat pakistan by 74 runs in 1st test match at rawalpindi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nana Patole | भाजपने शिवाजी महाराजांची बदनामी करणे हे जाणीपूर्वक रचलेले षडयंत्र – नाना पटोले

Shambhuraj Desai | “आमची हिंमत पाच महिन्यांपूर्वीच दाखवली”; संजय राऊतांच्या टीकेला शंभूराज देसाईंचे प्रत्युत्तर

Pune ACB Trap | रापमच्या भोर आगार व्यवस्थापकासह चालक 4 हजार रुपये लाच घेताना अँन्टी करप्शनच्या जाळ्यात