PAK vs ENG Test Match | पाकिस्तान संघाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार गोलंदाज मुल्तान कसोटीपूर्वी टीममधून बाहेर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – PAK vs ENG Test Match | पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 9 ते 13 डिसेंबर रोजी मुल्तान या ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा स्टार गोलंदाज हॅरिस रौफ या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. (PAK vs ENG Test Match)

 

रावळपिंडी या ठिकाणी खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली होती. ही दुखापत गंभीर असल्याने त्याला पुढील सामना खेळता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानसाठी सर्वात मोठा धक्का आहे. कारण पाकिस्तानचा हुकमी एक्का दुखापतीमुळे आधीच बाहेर आहे आणि आता हॅरिस रौफ बाहेर गेल्याने पाकिस्तान मोठ्या संकटात सापडला आहे. (PAK vs ENG Test Match)

 

क्षेत्ररक्षण करताना झाली दुखापत
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत क्षेत्ररक्षण करताना हॅरिस रौफच्या उजव्या पायाला दुखापत झाली होती. यानंतर त्याला एमआरआय स्कॅनसाठी रुग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर तो मैदानावर परतलाच नाही. पहिल्या डावात त्याने फलंदाजी केली, पण दुसऱ्या डावात गोलंदाजी करायला तो आला नाही. त्याने या सामन्यात पहिल्या दिवशी इंग्लंडला 13 षटकांत 78 धावा दिल्या. वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इतक्या धावा देणारा तो जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.

पहिल्या कसोटीत पाकिस्तानचा पराभव
पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानच्या हातातील सामना हिसकावून घेऊन पाकिस्तानवर रोमहर्षषक विजय मिळवला.
इंग्लंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल,
असे वाटत होते. पण पाकिस्तानने पाच धावांत चार विकेट्स गमावल्या आणि त्यांचा या सामन्यात पराभव झाला.
इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

 

Web Title :- PAK vs ENG Test Match | pak vs eng big blow for pakistan before multan test haris rauf out of second test

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Military Recruitment for Woman | पुण्यात महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळावा सुरू

Pune Railway News | वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून पुण्यातील लोको पायलट गायब; दोन दिवसांपासून तपास सुरू

Pune Crime | शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची कोट्यवधींची फसवणूक; पुणे जिल्ह्यातील प्रकार