PAK vs ENG Test Match | रावळपिंडी कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानवर विजय मिळवत केले ‘हे’ 4 वर्ल्ड रेकॉर्ड

पोलीसनामा ऑनलाइन : PAK vs ENG Test Match | पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानच्या हातातील सामना हिसकावून घेऊन पाकिस्तानवर रोमहर्षक विजय मिळवला. इंग्लंडने पाकिस्तानपुढे विजयासाठी 343 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण पाकिस्तानने पाच धावांत चार विकेट्स गमावल्या आणि त्यांचा या सामन्यात पराभव झाला. इंग्लंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानवर 74 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या पराभवामुळे पाकिस्तानचे 17 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात घरच्या मैदानावर विजय मिळवण्याचे स्वप्न भंगले. हा सामना एवढा रोमहर्षक झाला की या एकाच सामन्यात 4 वर्ल्ड रेकॉर्ड बनले. चला तर जाणून घेऊया ते 4 वर्ल्ड रेकॉर्ड. (PAK vs ENG Test Match)

1) एका दिवसात सर्वाधिक धावा

इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी 500 पेक्षा अधिक धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्या दिवशी कोणत्याही संघाने इतक्या धावा याआधी केल्या नव्हत्या. (PAK vs ENG Test Match)

2) एका दिवसात चार शतक

सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने फक्त सर्वाधिक धावांचा विक्रम केला नाहीतर तर त्यामध्ये चार फलंदाजांनी शतकं झळकावली. कसोटीत प्रथमच असे घडले की एका संघातील 4 खेळाडूंनी पहिल्याच दिवशी शतक झळकावले.

3) सामन्यात झाल्या 1 हजार 768 धावा

या कसोटी सामन्यात पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांनी मिळून 1 हजार 768 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका सामन्यात झालेली ही आजवरची सर्वोच्च धावसंख्या आहे. याअगोदर 2004 साली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी सामन्यात 1 हजार 747 धावा करण्यात आल्या होत्या.

४) हॅरी ब्रूकचे रेकॉर्ड

या सामन्यात हॅरी ब्रूकने 116 चेंडूत 19 चौकार आणि 5 षटकारांसह 153 धावा केल्या.
ब्रूकने फक्त 115 चेंडूत 150 धावा केल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथ्या क्रमांकाच्या या सर्वात जलद
धावा ठरल्या. एवढेच नाहीतर हॅरी ब्रूकने पहिल्या दिवशी एका षटकात 6 चौकार मारले तर दुसऱ्या दिवशी
जाहिद अहमूदच्या ओव्हरमध्ये 27 धावा वसूल केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात दोन वेळा 24 पेक्षा
जास्त धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

Web Title :-PAK vs ENG Test Match | pakistan vs england rawalpindi test see where 5 world record has made

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gold Silver Prices | सोने, चांदीच्या दरांत मोठी घट

Pune Crime | धक्कादायक! बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीचा धक्का; मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू; लोणी काळभोर परिसरातील घटना

Mirzapur Season 3 | मिर्झापूरचा 3 रा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; अभिनेत्याने दिले संकेत

Ajit Pawar | ‘इंदू मिल येथील स्मारक लवकर पूर्ण व्हावे, कोणीही राजकारण करू नये’ – अजित पवार