PAK vs NZ | PM इम्रान खान सुद्धा वाचवू शकले नाहीत पाकिस्तान-न्यूझीलंड क्रिकेट सीरीज, सुरक्षेच्या कारणामुळे शेवटच्या क्षणी रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  PAK vs NZ | पाकिस्तान आणि न्यूजीलंडमध्ये मर्यादित षटकांची क्रिकेट सीरीज (PAK vs NZ Series Abandoned) सीरीज ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. सुरक्षा करणांमुळे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी सीरीज न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) ही सीरीज स्थगित असल्याचे म्हटले आहे आणि भविष्यात आयोजित करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुद्धा ही सीरीज आयोजित करण्याचा प्रयत्न केला आणि न्यूझीलंडच्या पीएमसोबत चर्चा केली परंतु कोणताही तोडगा निघाला नाही.

पीसीबीने एकापाठोपाठ एक अनेक ट्विट केली आणि ही सीरीज स्थगित झाल्याचे म्हटले.
परंतु, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने (NZC) ने वक्तव्य जारी करून झाल्याचे म्हटले.
पाच मॅचच्या टी20 सीरीजसाठी लाहोरला जाण्यापूर्वी न्यूझीलंडला रावळपिंडीमध्ये अगादरच्या तीन वनडे मॅच खेळायच्या होत्या, ज्यांची सुरूवात शुक्रवारपासून होणार होती.
परंतु अखेरच्या क्षणी ती रद्द करण्यात आली. न्यूझीलंड टीमला 2003 च्यानंतर पाकिस्तानात पहिली मॅच खेळायची होती.

एनझेडसीने वक्तव्यात म्हटले की, धोका वाढत असल्याचे पाहून आणि बोर्डच्या सुरक्षा सल्लागारांच्या सल्ल्यानंतर, न्यूझीलंड सरकारने हा निर्णय घेतला आहे की, टीम या दौर्‍यात क्रिकेट सीरीज खेळणार नाही. आता टीमला परत बोलावण्याची व्यवस्था केली जात आहे.
बोर्डाचे सीईओ डेव्हिड व्हाईट यांनी म्हटले की, हा दौरा सुरू ठेवणे शक्य नव्हते.

यादरम्यान पीसीबीने पहिल्या ट्विटमध्ये म्हटले, आज सकाळी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून आम्हाला माहिती मिळाली की, त्यांना सुरक्षा व्यवस्थेबाबत सावध करण्यात आले आहे.
या कारणामुळे त्यांनी सीरीज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title : PAK vs NZ | cricket pakistan vs new zealand series postpone due to security reasons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Deshmukh | अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ ! नागपुरमधील मालमत्तांवर आयकर विभागाचा छापा

Pune Crime | इंदापूरमध्ये दुचाकीस्वारानं रस्त्यावर पडलेले पैसे उचलण्याच्या नादात 2 लाख गमावले

Health News | दुसर्‍या लाटेनंतर लहान मुलं आणि प्रौढांमधील मणक्याच्या वेदनांमध्ये चार पटींनी वाढ; मणक्याच्या दुखण्याकडे दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा इशारा