‘तर पाकिस्तान बाॅर्डरच्या जवळही फिरकणार नाही’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – एकदा राफेल विमान हवाई दलात समाविष्ट झाले की, मग पाकिस्तान एलओसी किंवा बाॅर्डरच्या आसापसही फिरकणार नाही, असे वक्तव्य भारतीय हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी धनोआ बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

एएनआयने आपल्या ट्विटमध्ये धनोआ यांचे वक्तव्य ट्विट करताना म्हटले आहे की, “एकदा का राफेल विमान हवाई दलात समाविष्ट झाले की, पाकिस्तान एलओसी किंवा बाॅर्डरच्या आसपासही फिरकणार नाही.

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. भारताने त्याला चांगलेच प्रत्युत्तर दिले होते. यानंतरही पाकिस्तानकडून रोजच सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. काही वेळा यात भारतीय जवान शहीदही होतात. अशातच धनोआ यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. कारण राफेल विमान भारतीय हवाई दलात समाविष्ट झाल्यानंतर पाकिस्तानकडून कसल्याही प्रकारच्या कुरापती होणार नाहीत, असेच धनोआ यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.