विकृतीची हद्द ! पाकिस्तानमध्ये ‘मांजरी’च्या पिल्लावर एका आठवड्यापर्यंत सामूहिक ‘बलात्कार’, तडफडून मृत्यू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या लाहोरमधून पशु क्रूरतेची एक बातमी समोर आली आहे आणि त्या बातमीने माणुसकीला काळिमा फासला आहे. लाहोरमध्ये 15 वर्षाच्या मुलाने आणि त्याच्या मित्रांनी एका मांजरीवर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर या मांजरीच्या पिलाचा मृत्यू झाला. मांजरीच्या पिल्लासमवेत क्रौर्याची ही बातमी तेव्हा उघडकीस आली जेव्हा तेथील प्राणी हक्क संघटना जेएफके अ‍ॅनिमल रेस्क्यू आणि शेल्टरने घटनेची माहिती फेसबुक हँडलवर शेअर केली आणि लोकांना या अल्पवयीन मुलांच्या जघन्य गुन्ह्याबद्दल माहिती दिली.

प्राणी हक्क संघटनेच्या फेसबुक पोस्टनुसार, मांजरीचे पिल्लू अल्पवयीन मुलाच्या कुटूंबाने खरेदी केले होते. जेव्हा ते घरी आणले तेव्हा अल्पवयीन मुलाने आणि त्याच्या मित्रांनी त्या मांजरीच्या पिलावर एका आठवड्यापर्यंत सामूहिक बलात्कार केला, त्यामुळे त्याचे अंतर्गत अवयवांचे तीव्र नुकसान केले. निष्पाप मांजरीच्या पिल्लूच्या जखमेतून रक्तस्त्राव होत होता. जेएफके अ‍ॅनिमल रेस्क्यू अँड शेल्टर यांनी म्हटले आहे की, ‘ते चालू शकत नव्हते, त्याला खाताही येत नव्हते, त्याला बसता येत नव्हते, वेदनेमुळे त्याला झोपता देखील येत नव्हते.

जेव्हा त्याला पशुवैद्याकडे नेण्यात आले तेव्हा त्याच्या अंतर्गत अवयवांमधून बरेच शुक्राणू आणि रक्त बाहेर आले. दरम्यान त्याला वाचवता येऊ शकले नाही. प्राणी हक्क संघटनेने म्हटले आहे की, ‘मांजरीच्या पिलास पुरण्यात आले आहे आणि ते नक्कीच आता देवाच्या जवळ असेल.