पाकिस्तानच्या माजी उच्चायुक्‍तांची चांगलीच ‘फजिती’, पॉर्न स्टारला समजले ‘काश्मीरी पंडित’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी काश्मीर मुद्यावर एका  ट्वीटला  रिट्वीट करत चांगलीच फजिती करून घेतली आहे. बासित यांनी एक ट्विट रिट्वीट केले ज्यात एका पॉर्न स्टारला पीडित काश्मिरी तरुण म्हंटले होते. याबाबतचे वृत्त एएनआय’ वृत्तसंस्थेने दिले आहे.

पूर्व PAK उच्चायुक्त की फजीहत, पोर्न स्टार को समझा कश्मीरी पीड़ित

अमर नावाच्या सोशल मीडिया यूजरने ट्विट केले होते. अमरने अडल्ट स्टारचा फोटो शेयर करत लिहिले की, ‘हा अनंतनागचा रहिवासी युसुफ आहे. पॅलेट गनमुळे, त्याची दृष्टी गेली आहे. कृपया आवाज उठवा. या ट्विटला  बासित यांनी  रिट्वीट केले होते.

पूर्व PAK उच्चायुक्त की फजीहत, पोर्न स्टार को समझा कश्मीरी पीड़ित
पाकिस्तानी पत्रकार नायला इनायतने एक स्क्रीनशॉट शेअर करुन अब्दुल बासितची चूक निदर्शनास आणून दिली. नायला यांनी लिहिले की, ‘माजी उच्चायुक्ताने  जॉनी सीन्सला (अ‍ॅडल्ट स्टार)  काश्मिरी तरुण समजले.’ आपली चूक लक्षात आल्यानंतर अब्दुल बासित यांनी ट्विट डिलीट केले. पाकिस्तानी अधिकारी किंवा नेत्यांनी काश्मीरबद्दल चुकीची माहिती शेयर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

पूर्व PAK उच्चायुक्त की फजीहत, पोर्न स्टार को समझा कश्मीरी पीड़ित
भारताने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे  370 वे कलम रद्द केल्यापासून पाकिस्तानकडून आकांडतांडव करण्यात येत आहे.  या गोष्टीमुळे पाकिस्तान इतका संतापला होता की,  पाकिस्तानकडून ट्विटरवर आपला राग व्यक्त करणे सुरु केले होते. कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरवर बनावट बातम्या पसरविण्याचे तसेच पाकिस्तानच्या वतीने ट्विटरवर खोटी छायाचित्रे पसरवल्याची प्रकरणे समोर आली होती.  पाकिस्तानची 200 हून अधिक ट्विटर अकाउंट हिंसेला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली ट्विटरकडून बंद करण्यात आली होती.

पूर्व PAK उच्चायुक्त की फजीहत, पोर्न स्टार को समझा कश्मीरी पीड़ित