कबूल कबूल कबूल ! पाकिस्तानने दिली देशात दहशतवादी असल्याची कबुली

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानने आपल्या देशात दहशतवादी आणि कट्टरवादी असल्याची कबूली दिली आहे. या देशातील अशा लोकांविरुद्ध बरेच काही करण्यासारखे असल्याचे मत पाकिस्तानचे लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल हसन गफून यांनी व्यक्त केले आहे. पाक लष्करानेच हे मत मांडल्यामुळे भारताचा दावा आणखी बळकट झाला आहे.
पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घातले जात आहे, असा आरोप भारताने अनेक वेळा केला आहे. मात्र प्रत्येकवेळी पाकने भारताच्या आरोपाचा इन्कार केला. त्यामुळे जोपर्यंत पाक दहशतवाद्यांना खतपाणी घालणे बंद करत नाही तोपर्यंत चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका भारताने घेतली आहे.

दहशतवाद्यांनी पुलवामा येथे हल्ला केला. यानंतर परिस्थिती बदलली असून जगभरातून पाकवर दबाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांवर ठोस कारवाई करावी अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहा असा इशारा अमेरिकेने पाकिस्तानला दिला. त्यानंतर पाकिस्तानने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर कारवाई केली. पाकिस्तानने केलेली ही कारवाई धुळफेक असल्याची टीका भारताने केली आहे.

सध्याचे सरकार हे प्रमाणिकपणे पावलं टाकत असल्याचे गफूर म्हणाले. पंतप्रधान इम्रान खान हे लष्कराच्या हातातल बाहुलं असल्याची कायम टीका केली जाते. मात्र गफूर यांनी इम्रान खान यांचे केलेले कौतुक महत्वाचे मानले जात आहे. दहशतवाद्यांमुळे पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान झाले. पाकिस्तानने खूप काही सोसले आहे. त्यामुळे आमच्या भूमिकेविषयी शंका घेऊ नका. आम्ही ठोसपणे कारवाई करत आहोत आणि करत राहणार असे गफूर यांनी सांगितले आहे.