आता अफगाणिस्ताननेही दिला PAK ला झटका ! सीमेवरील गोळीबाराविरोधात UNSC कडे तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीर प्रश्नाचे जागतिकीकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाकडे तक्रार करण्यासहीत पाकिस्तानने अनेक प्रयत्न करत जंगजंग पछाडले मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. याउलट संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) पाकिस्तानच्या समस्या वाढताना दिसत आहेत. अफगाणिस्तानने आता पाकिस्तानची यूएनएससीकडे तक्रार केली आहे. पाकिस्तान सतत आपल्या शहरांवर गोळीबार करीत असल्याचा आरोप अफगाणिस्तानने केला आहे.

अफगाणिस्तानचे म्हणणे आहे की पाकिस्तान सीमेला लागून असलेल्या अफगाणिस्तानच्या शहरांवर सातत्याने गोळीबार करीत आहे. अशी तक्रार करताना अफगाणिस्तानने युएनएससीला(UNSC) पाकिस्तानविरूद्ध योग्य कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अलीकडेच पाकिस्तानकडून अफगाणिस्तानच्या सीमेवर रॉकेट डागण्यासहीत गोळीबार केल्याच्या बातम्या आल्या आहेत. पाकिस्तानकडून अफगाणिस्तानमधील कर्नर प्रांताच्या भागात ही रॉकेट्स उडाली होती.

काय म्हटले आहे अफगाणिस्तानने पत्रात :
यूएनएससीला दिलेल्या पत्रात, यूएन मधील अफगाणिस्तान राजदूत अ‍ॅडेला राज यांनी सांगितले की, पाकिस्तानी सैनिकांनी १९ ऑगस्ट ते २० ऑगस्ट दरम्यान शेल्टन जिल्ह्यात २०० रॉकेट डागले. पत्रात असे लिहिले होते की या हल्ल्यांमुळे मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले असून स्थानिक लोकसंख्या विस्थापित झाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर योग्य ती कारवाई करण्याची अफगाणने सुरक्षा परिषदेची मागणी केली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –