पाकिस्तानची केली पोलखोल ! US चे सिनेटर म्हणाले – ‘या देशाला दोन्ही हाताने लाडू खाण्याची सवय’

वॉशिंग्टन : वृत्त संस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिकांना 11 सप्टेंबरपर्यंत परत बोलावण्याची घोषणा केली आहे. यासोबतच नाटोने सुद्धा आपले सैन्य दल परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्तापित करण्यात पाकिस्तानची महत्वाची भूमिका पहाते, मात्र, एका अमेरिकन खासदाराने म्हटले की, भारताचा हा शेजारी देश आपल्या दोन्ही हातांनी लाडू खात आला आहे.

वरिष्ठ अमेरिकन खासदार जॅक रीड यांनी म्हटले की, पाकिस्तान दोन्हीकडून खेळ खेळतो. पाकिस्तान दहशतवादाला नेहमी सुरक्षित आश्रय देत आला आहे आणि यामुळे तालिबानची मुळे अफगाणिस्तानमध्ये खोलवर रूजली.

सीनेट आर्म्ड सर्व्हिस कमेटीचे चेयरमन जॅक रीड यांनी गुरुवारी अमेरिकन संसदेत म्हटले की, तालिबान यशस्वी होण्यात मोठे योगदान पाकिस्तानचे आहे. तालिबानला पाकिस्तानमध्ये मिळत असलेला सुरक्षित आश्रय संपवण्यात अमेरिका अयशस्वी ठरली आहे. पाकिस्तानी लष्कर आपल्या देशातील इतर मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी तालिबानचा वापर करत आले आहे. याच कारणामुळे अमेरिकन सैनिकांच्या परतीने ही शंका व्यक्ती केली जात आहे की, तालिबान पुन्हा डोके वर काढेल आणि याचा परिणाम काश्मीरमध्ये दिसू शकतो.

एका वृत्तसंस्थेनुसार, जॅक रीड यांनी आपला दावा करत एका अभ्यासाचा संदर्भ दिला. जॅक रीड यांनी म्हटले की, पाकिस्तानमध्ये तालिबानला सुरक्षित आश्रय असणे आणि इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) सारख्या संघटनांद्वारे तेथील सरकारकडून समर्थन मिळत असल्याने तालिबानचे युद्ध जारी ठेवणे आवश्यक आहे. या युद्धात तालिबानची सुरक्षित आश्रय स्थाने नष्ट न करता येणे ही वॉशिग्टनची सर्वात मोठी चूक आहे.

रीड यांनी अफगाण स्टडी गटाचा उल्लेख करत म्हटले की, तालिबानी दहशतवादासाठी ही आश्रयस्थाने आवश्यक आहेत. पाकिस्तानची गुप्तचर एजन्सी आयएसआयने संधीचा फायदा घेण्यासाठी अमेरिकेशी सहकार्य करत तालिबानला सातत्याने मदत केली आहे.