PoK वरील लष्कर प्रमुख नवरणे यांचं वक्तव्य पाकिस्तानला ‘झोंबल’, म्हणाले – ‘आम्ही देखील तयार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ‘सैन्याला जर संसदेकडून आदेश मिळाला तर आम्ही पाकव्याप्त काश्मीरचे नियंत्रण घेऊ शकतो, असे लष्कर प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी शनिवारी सांगितले. दरम्यान, लष्करप्रमुखांच्या या विधानानंतर पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला असून पाकिस्तानने भारताला पोकळ धमक्या देण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्कर प्रवक्त्याच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘देशाच्या परिस्थितीवरून लक्ष हटविण्यासाठी भारतीय लष्कर प्रमुखांनी हे वक्तव्य केले आहे. तसेच पाकिस्तानी सेना भारताने केलेल्या कोणत्याही कारवाईला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.’

सैन्य दिनापूर्वी सैन्य प्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सियाचीन ग्लेशियरमध्ये सैन्य खूप सतर्क आहे, कारण या संवेदनशील क्षेत्रात भारताविरूद्ध चीन आणि पाकिस्तान एकत्रित होण्याची शक्यता आहे. तसेच लष्करप्रमुख म्हणाले कि, “पाकव्याप्त काश्मीरबाबत सांगायचे झाल्यास संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा एक भाग आहे, असा ठराव संसदेत संमत झाला होता. जर संसदेला हे क्षेत्र पूर्णपणे आपल्याकडे हवे असेल आणि त्यासंदर्भात आम्हाला आदेश मिळाल्यास आम्ही त्या दिशेने नक्कीच कारवाई करू.

फेब्रुवारी १९९४ मध्ये संसदेत हा ठराव संमत करण्यात आला की, पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमधील हल्ले करून घेतलेली जमीन पूर्णपणे रिकामी करावी. त्या ठरावात असे सांगण्यात आले की, भारताच्या कोणत्याही अंतर्गत मुद्यात पाकिस्तानच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांवर भारताकडून कठोर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे भारताने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा मागे घेतल्यानंतर आणि राज्याला दोन केंद्र शासित प्रदेशात विभागल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांनी सांगितले कि, आता पीओके ताब्यात घेण्याकडे लक्ष दिले पाहिजे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही म्हटले होते की, जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर त्या चर्चा फक्त पीओकेच्या विषयावरच असाव्यात.

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने दोन नागरिकांच्या हत्येबाबत जनरल नरवणे म्हणाले की, भारतीय सेना अशी कारवाई करणार नाही. आम्ही अशा परिस्थितीचा सामना लष्करी पद्धतीने करू. ते म्हणाले की, भारतीय सेना नियंत्रण रेषेवरील देशासह अत्यंत व्यावसायिक आणि नैतिकतेने वागते. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याविरूद्ध गैरवर्तनाच्या तक्रारींबद्दल ते म्हणाले की, तपासात सर्व आरोप ‘निराधार’ असल्याचे निदर्शनास आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/