जिनेव्हात पाकिस्तानची पुन्हा ‘फजिती’, लागले ‘पाक आर्मी आंतरराष्ट्रीय आतंकवादाचं केंद्र’ असे ‘पोस्टर’

जिनेव्हा : वृत्त संस्था – स्विझर्लंडमध्ये पाकिस्तान लष्कर अंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र असल्याचे सांगणारे पोस्टर लावण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या 43व्या सत्रादरम्यान जिनेव्हामध्ये ब्रोकन चेयर स्मारकाजवळ लावण्यात आलेल्या पोस्टरवर लिहिले आहे की, पाकिस्तानी लष्कर अंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्र आहे.

यापूर्वी सुद्धा अशाप्रकारचे पोस्टर जिन्हेव्हात दिसून आले होते. जिनेव्हात सप्टेंबर 2019 मध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत काश्मीर-काश्मीर ओरडणार्‍या पाकिस्तानची तेव्हा अंतरराष्ट्रीय पातळीवर बेईज्जती झाली होती, जेव्हा त्यांच्याच देशातील लोकांनी कार्यक्रम स्थळाच्या बाहेर पाकिस्तानी सरकार आणि लष्कराचे अत्याचार उघड केले होते. बलूच मानवाधिकार परिषद आणि पश्तूनांनी पाकिस्तानी अत्याचाराच्या विरोधात जगाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यक्रमाच्या ठिकाणी बाहेर पोस्टर लावले होते.

बलूच संघटनानी द ह्यूमनिटेरियन क्रायसिस इन बलूचिस्तान नावाच्या एका कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा केले होते, ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये होत असलेल्या मानवाधिकार उल्लंघनाबाबत जगाला माहिती दिली गेली.

You might also like