‘या’ कारणामुळं पाकिस्तानी सेना भडकली शाहरूख खानवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवूडचा किंग खान सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. यावेळी कोणत्या सिनेमामुळे नाही तर पाकिस्तानच्या लष्कराने त्याच्यावर दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे शाहरुख चर्चेत आला आहे.

शाहरुख खानची एक वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होणार आहे. शाहरुखने नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर शेअर केला. याच वेबसीरिजवरून पाकिस्तानची सेना शाहरुखवर भडकली आहे.

शाहरुख खानची येत असलेली आगामी वेबसिरीज भारताच्या धाडसी गुप्तहेरांची माहिती देणारी आहे. ज्यात पाकिस्तानच्या अनेक गुप्त बाबींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे शाहरुख विरोधात पाकिस्तानच्या लष्कराने आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘शाहरुख तुला बॉलिवूड सिंड्रोम आहे. सत्य जाणून घेण्यासाठी तू ‘रॉ’चे एजंट कुलभूषण जाधव, विंग कमांडर अभिनंदन आणि २७ फेब्रुवारी २०१९ कडे पाहायला हवं. शाहरुख काश्मीरमधील जनतेवर होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध तू आवाज उठवायला हवा. आरएसएसच्या नाझीवादी हिंदुत्वामुळे या अत्याचारांमध्ये सतत वाढ होत आहे,’ असं ट्वीट आसिफ गफूर यांनी केलं आहे.

पाकिस्तानच्या या प्रतिक्रियांनंतर भारत पाकिस्तान सोशलमीडिया वॉरला सुरवात होणार की काय ? कारण पाकिस्तानच्या या प्रश्नांना शाहरुख काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like