‘राफेल’ शस्त्र पुजेवरून ‘ट्रोल’ होणारे संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांच्या समर्थनात थेट पाकिस्तानी लष्कर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फ्रांसकडून मिळालेल्या पहिल्या राफेल विमानाची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विधीवत पूजा केली होती. यामुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी ट्रोल केले होते. मात्र पाकिस्तान आर्मीचे प्रवक्ते आसिफ गफूर यांनी राजनाथ सिंह यांची पाठराखण केली आहे. गफूर यावेळी म्हणाले की, राफेल पूजेमध्ये काहीही चुकीचे नाही कारण ही पूजा धर्मानुसार विधिवत आहे.

गफूरने यांनी याबाबत एक ट्विट केले आहे त्यामध्ये ते म्हणतात, राफेल पूजेमध्ये काहीही चुकीचे नाही आणि याचा सन्मान आपण केला पाहिजे कारण ही केवळ मशीन नाही तर चालवणाऱ्याची उत्कंठा आणि दृढनिश्चय देखील आहे. यानंतर गफूर यांनी पाकिस्तानकडे असलेल्या शाहीन मिसाईलचा देखील उल्लेख केला आणि आम्हाला आमच्या एयरफोर्समधील शाहीनवर गर्व असल्याचे देखील सांगितले.

या आधी मात्र इम्रान खान यांच्या मंत्री मंडळात मंत्री असलेल्या फवाद चौधरी यांनी भारताला मिळालेल्या राफेल विमानाबाबत थट्टा करणारे एक ट्विट केले होते. ज्यामध्ये राफेल विमानाला लिंबू मिरची लावलेला एक फोटो ट्विट करण्यात आला होता.

दसऱ्याच्या मुहूर्तावर 8 ऑक्टोबर रोजी राजनाथ सिंह यांनी पहिल्या राफेल विमानाची पूजा केली होती. यावेळी सरंक्षणमंत्र्यांनी राफेल विमानावर ओम असे लिहिले होते आणि नारळ, फुल वाहून नजर लागू नहे म्हणून चाकाखाली लिंबू सुद्धा ठेवले होते.

यानंतर काँग्रेस पार्टीकडून हे अशा प्रकारचे शस्त्र पूजन केल्यामुळे निंदा करण्यात आली होती. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी या सर्व प्रकाराला तमाशा म्हणून संबोधले होते. तसेच नेते उदित राज यांनी देखील या प्रकारावर आक्षेप घेत म्हंटले होते की, ज्या दिवशी देशातून अंधविश्वास दूर होईल त्यावेळी भारत देश स्वतःचे राफेल फायटर विमान बनवायला सुरुवात करेल.

 

visit : Policenama.com