‘या’ मौलानांमुळं 24 तासाच्या आत इम्रान खानला सत्तेतून पायउतार व्हावं लागू शकतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात इमरान खान यांची सत्ता पालट करण्यासाठी विरोधकांबरोबरच धार्मिक गुरु देखील पाय रोवून उभे ठाकले आहेत. शुक्रवारी विरोध पक्षांनी जमीयत उलेमा-ए-इस्लाम फजलचे मौलाना फजलूर रहमान यांच्याबरोबर मिळून इमरान खान यांच्या विरोध आणखी वेगवाग केला. तसेच पंतप्रधान इमरान खान यांना 48 तासात राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मौलाना फजलूर रहमान या धर्मगुरुंच्या कारणाने इमरान खान यांच्या सरकारची सत्ता पालट होण्याची वेळ आली आहे.

कोण आहे हे धार्मिक गुरु
66 वर्षीय मौलाना फजलूर रहमान पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या धार्मिक पार्टी आणि सुन्नी कट्टरपंथी पक्ष जमीयत उलेमा-ए-इस्लामचे अध्यक्ष आहेत. त्याचे वडील खैबर पख्तूनख्वा प्रांताचे मुख्यमंत्री होते. तेथील राजकारणात त्यांच्या कुटूंबाचा प्रभाव आहे.

मौलाना पाकिस्तानाच्या नॅशनल असेंबलीमध्ये विपक्ष नेता म्हणून देखील कार्यरत होते. संसदेत ते परराष्ट्र धोरणात स्टॅंडिंग कमेटीमध्ये अध्यक्ष, काश्मीर कमेटीची मुख्य होते. ते तालिबान समर्थक मानले जातात परंतू मागील काही वर्षापासून उदारमतवादी झाल्याचा दावा करत आहेत.

याशिवाय 2018 च्या निवडणूकीनंतर इमरान खान यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. मागील काही राष्ट्रपती निवडणूकीत ते विरोधी पक्षाचे उमेदवार देखील होते सत्तेत नसताना ते नवाज शरीफ यांच्या सरकारमध्ये केंद्रीय मंत्री दर्जाचे नेते होते. मौलानाचे धार्मिक कार्ड अत्यंत प्रभावशाली आहे. त्यांचा पाकिस्तानातील सर्वात मोठा धार्मिक पक्ष आहे. अमेरिकी अभियानाला ते इस्लाम विरोधी सांगत जिहादची घोषणा देखील करत होते.

या आधी देखील पाक पंतप्रधानांच्या विरोधात काढले होते मोर्चे
1988 साली जेव्हा बेनजीर भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले होते तेव्हा एका महिलेचे अपहरण केल्याचे सांगत त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते परंतू नंतर बेनजीर यांची भेट घेतल्यानंतर मौलाना यांचे आंदोलन शमले होते.

मुशर्रफ हे सत्तेत असताना देखील मौलना रहमान यांनी कायमच विरोध प्रदर्शन केले. 2001 मध्ये अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील तालिबानच्या विरोधात अमेरिकांने कारवाई सुरु केली होती तेव्हा मौलाना यांनी मुशर्रफ यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले होते. जॉर्ज बुश यांच्या विरोधात जिहादची घोषणा देऊन पाकिस्तानच्या अनेक शहरात तालिबानचे समर्थन करणाऱ्या रॅली मौलानांनी काढल्या होत्या. मुशर्रफ यांनी तेव्हा मौलाना यांना नजरकैदेत देखील ठेवले होते.

बनू इच्छित होते पंतप्रधान
2007 साली एका रिपोर्टमधून समोर आले की या मौलानांनी मुशर्रफ याची सत्ता पालट करण्यासाठी एका अमेरिकी राजदूताला सीक्रेट डिनरला देखील बोलावले होते. त्यांनी स्वताला पंतप्रधान होता यावे यासाठी अमेरिकेचे समर्थन मागितले होते. त्यावेळी मौलानांनी सांगितले की ते तालिबानचे समर्थन सोडून ते पाकिस्तानचे पंतप्रधान बनू इच्छित आहेत आणि अमेरिकेत देखील येऊ इच्छित आहेत. ज्यावेळी विरोधक मुशर्रफ यांना कोंडी पकड होते, मुशर्रफ यांची सत्ता कमकूवत होत होती तेव्हा हे मौलाना अमेरिकेच्या समर्थनात पाकिस्तानचे पंतप्रधान बनण्याचा डाव आखत होते.

2018 च्या सार्वत्रिक निवडणूकीत इमरान खान बहुमत मिळवून सत्तेत आले. या निवडणूकीला मौलना रहमान यांनी फसवणूक करुन सत्तेत आल्याचे सांगितले आहे. निवडणूकीदरम्यान मौलानाने इमरान खानच्या विरोधात मोर्चा उघडला होता. पहिल्यांचे विरोधकांचे सरकार बनवण्याचा प्रयत्न करण्यात आले त्यानंतर राष्ट्रपती निवडणूकीत विरोध दर्शवला आणि त्यानंतर आता आझादी मोर्चाची घोषणा केली. मौलनांनी पाकिस्तानतील आर्थिक संकटाचे कारण इमरान खान यांचे धोरण सांगितले आहे. आता ते नवी निवडणूक करुन नवे सरकार गठीत करण्यात यावे अशी मागणी करत आहेत.

विरोध पक्षांचे मौलांनाना समर्थन
27 ऑक्टोबरला मौलाना रहमान यांनी इस्लामाबादमध्ये मोर्चा काढण्याचा घोषणा केली आहे. मौलानांनी कार्यकर्त्यांना इस्लामाबादच्या डी-चौकात जमा होऊन इमरान खान सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सांगितले आहे. पाकिस्तानचे दोन प्रमुख पक्ष नवाज शरीफ यांची पीएमएल – एन आणि बिलावल भुट्टो यांची पीपीपी यांनी देखील मौलानांना समर्थन दिले आहे. याशिवाय इतर पक्षांनी देखील त्यांना समर्थन दिले आहे.

मौलानांची तयारी पाहून इमरान खान यांच्या पीटीआय पक्षाने मौलानांना चर्चेसाठी बोलावले आहे. लोकांना आता 2014 साली इमरान खान यांनी विरोध पक्षाच्या रुपात इस्लामाबादेत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या