7 दिवसांतच पाकिस्तानची ‘वाट’ लागली, भारतासोबत ‘शत्रुत्व’ घेऊन ‘पाक’ला बसले ‘हे’ 5 ‘दणके’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द करण्यासाठी आज ५वा दिवस आहे आणि गेल्या काही दिवसांपासून भारत सरकार जम्मू-काश्मीरमधील लोकांची मने जिंकण्यात व्यस्त आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती दिवसेंदिवस सामान्य होत आहे. अलीकडेच पीएम मोदींनी आपल्या भाषणात असेही सांगितले की जम्मू-काश्मीरच्या लोकांना ईद साजरी करण्यात काही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन आणि सरकारने बरीच पावले उचलली आहेत.

मात्र जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होत असल्याने पाकिस्तानचा जळफळाट मात्र वाढतच चालला आहे. रागाच्या भरात पाकिस्तान अशी पावले उचलत आहे आणि निर्णय घेत आहे ज्यामुळे तो स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून मोठे नुकसान करून घेत आहे. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना गेल्या एका आठवड्यात ५ मोठे धक्के बसले आहेत, ज्यामुळे आता पाकिस्तानला त्रास होत आहे. जर पाकिस्तानला हे वेळेत लक्षात आले नाही, तर नंतर पश्चात्ताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काहीच उरणार नाही.

१. परकीय भांडवलाच्या साठ्याला ग्रहण
पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. केवळ दोन महिन्यांच्या निर्यातीला पुरु शकेल एवढाच परकीय भांडवलाचा साठा त्यांच्याकडे आहे. यामुळे तेथे परकीय कर्जवाढीचे संकट उद्भवू शकते. त्यामुळे पाकिस्तानला काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक वित्तीय व्यवस्थेत पाकिस्तानचा प्रवेश कमी होईल आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने त्यास दिलेल्या ६ अब्ज डॉलर्सच्या कार्यक्रमावरही परिणाम होईल.

२. पाकिस्तान जगात एकाकी पडेल
काश्मीरच्या प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी पाकिस्तान सातत्याने प्रयत्न करीत आहे. पण पाकिस्तान या मुद्द्यावर एकाकी पडला आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी सर्व देशांना यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले पण पाक पंतप्रधानांच्या या चुकीच्या पावलाचे कोणीही समर्थन केले नाही. रशिया आणि अमेरिकेने भारताच्या या अंतर्गत बाबींमध्ये न पडणे पसंत केले तर चीनही काश्मीरच्या मुद्दय़ावर मौन बाळगून आहे. कारण चीनला असे वाटते की जर या मुद्यावर त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला तर तर भारताशी व्यावसायिक संबंधांवर परिणाम होऊ शकतो.

३.पाकिस्तानी शेयर बाजार हादरला
पाकिस्तानी शेअर बाजाराला भारताबरोबरचे शत्रुत्व सहन करता आले नाही. भारताशी व्यापार संबंध तोडल्यानंतर पाकिस्तानचा शेअर बाजार कोसळू लागला आहे. गेल्या ५ वर्षांतील सर्वात मोठी घसरण गुरुवारी नोंदविली गेली, यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत.अवघ्या दोन दिवसांत कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये (केएसई) सुमारे १५०० अंकांची घसरण झाली. यासह, शेअर बाजार ३० हजारांच्या पातळी खाली आला. यामुळे गुंतवणूकदारांचे ७४०० कोटी पाकिस्तानी रुपये बुडले आहेत. इतकेच नाही तर पुढच्या आठवड्यातही मोठी घट होण्याची शक्यता आहे.

४. महागाईत प्रचंड वाढ
वास्तविक पाकिस्तानी नागरिकांना बर्‍याच उत्पादनांबाबत भारतावर विश्वास आहे. ज्यामुळे पाकिस्तानचे रोज मोठे नुकसान होत आहे. दोन देशांमधील व्यापारात भारत पाकिस्तानकडून २० टक्के तर पाकिस्तान भारताकडून ८० टक्के आयात करतो. यावरून हे स्पष्ट झाले आहे की व्यापार थांबल्यामुळे पाकिस्तानला हा फटका सहन करावा लागला आहे.

५. महागाईचा परिणाम उद्योगालाही झाला
इतर देशांच्या तुलनेत पाकिस्तानला भारताकडून रसायने, रंगरंगोटी आणि इतर उत्पादनांना ३५ टक्के स्वस्त दर मिळात असे. आता पाकिस्तानात, उद्योगांना इतर देशांकडून समान वस्तू घ्याव्या लागतील, ज्याचा खर्च खूपच महाग असेल. अशा परिस्थितीत, जर कच्च्या मालाला ३५ टक्के महाग किंमत मिळाली तर उत्पादनाची किंमत देखील लक्षणीय वाढेल. इतर देशांकडून वस्तू मिळण्यास अधिक वेळ लागेल आणि मालवाहतुकीवरही अधिक खर्च होणार आहे. भारत आणि पाकिस्तान दरम्यान २०१८-१९ मध्ये सुमारे १८ हजार कोटींची उलाढाल झाली.

आरोग्यविषयक वृत्त –