तणावादरम्यानच पाकनं केलं ‘गजनवी’ क्षेपणास्त्राचं ‘परिक्षण’, भारताकडं ‘ही’ 4 मिसाईल पुर्वीपासुनच ‘रेडी’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये वातावरण तापलेले असताना पाकिस्तानने आपल्या नवीन मिसाईलचे परीक्षण केले आहे. ‘गजनवी’ असे या बॅलेस्टिक मिसाईलचे नाव असून जमिनीपासून जमिनीवर मारा करणाऱ्या या मिसाईलची क्षमता 290 ते 320 किलोमीटर पर्यंत आहे. त्याचबरोबर 700 किलोपर्यंत स्फोटके वाहून नेण्याची क्षमता देखील या मिसाईलमध्ये आहे.

या मिसाईलचे परीक्षण करून पाकिस्तान जगभरात तणाव असल्याचा संदेश देत आहे. यासाठी पाकिस्तानाने काराचीमधील तीन हवाई मार्ग देखील बंद केले होते. त्याचबरोबर आपल्या नौदलाला देखील त्यांनी अलर्ट राहण्यासाठी सांगितले होते. यासाठी पाकिस्तानने तीन दिवस आधीच भारताला याची सूचना दिली होती. त्यानुसार काल रात्री त्यांनी हे परीक्षण केले आहे. मात्र पाकिस्तानने जरी या मिसाईलचे परिक्षण करून भारताला धमकावण्याचा प्रयत्न केला असला तरी भारताकडे पाकिस्तानपेक्षा वेगवान आणि अधिक लांब पल्ल्याची मिसाईल असून भारताची फक्त चार मिसाईलच पाकिस्तानवर भारी पडू शकतात.

ही 4 मिसाईल पाकिस्तानच्या मिसाईलवर पडू शकतात भारी

1)अग्नि – 2 -मारक क्षमता 2000 किमी, स्फोटक वाहन क्षमता 1000 किलो

2)सागरिका – मारक क्षमता 700 किमी, स्फोटक वाहन क्षमता 500-800 किलो

3)अग्नि – 1 – मारक क्षमता 700 – 1200 किमी,स्फोटक वाहन क्षमता 2000 किलो

4)शौर्य – मारक क्षमता 700 किमी, स्फोटक वाहन क्षमता 800 किलो

आरोग्यविषयक वृत्त –