पाकिस्तानच्या क्वेट्टातल्या मशिदीत बॉम्बस्फोट, पोलीस अधीक्षकासह 12 ठार 21 जखमी

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – मशिदीत झालेल्या एका बॉम्बस्फोटाने पाकिस्तान हादरून गेले आहे. आज बलुचिस्तानमध्ये एका मशिदीत हा भीषण बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला तर 21 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये क्वेट्टाच्या पोलीस अधीक्षकांचाही समावेश आहे. शुक्रवार असल्याने मशिदीत प्रार्थनेसाठी अनेक लोक आले होते. त्याचवेळी हा बॉम्बस्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सुरक्षा दलाने घटनास्थळाला वेढा दिला असून आरोपीँचा शोध सुरु केला आहे. तसेच आरोपींची शोध मोहिम सुरु केली असल्याचे पाकिस्तानच्या लष्करी प्रवक्त्याने सांगितले आहे. बॉम्बस्फोट करणाऱ्यांना शोधून काढू असेही पाकिस्तानच्या प्रवक्त्याने सांगितेले आहे.

दरम्यान या घटनेची अद्याप कोणीही जबाबदारी स्विकारली नाही. पाकिस्तानी लष्कराकडून बॉम्बस्फोट करणाऱ्याचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. मृतांमध्ये पोलीस आणि नागरिक किती आहेत हे अद्याप समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/