…म्हणून पाकिस्तानने ‘ब्लॉक’ केल्या ८ लाख ‘पॉर्न’ साईट्स !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतापाठोपाठ आता पाकिस्तानातही पॉर्न वेबासाईट्स ब्लॉक केल्या जात आहे. पाकिस्तानातील सिनेटच्या एका समितीला सांगण्यात आलं आहे की, देशातील ८ लाख अश्लील वेबसाईट्स बंद करण्यात आल्या आहेत. देशात एकूण पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार, पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणचे(पीटीए) अरमन सेवानिवृत्त मेजर जनरल आमिर अजीम बाजवाने सीनेटच्या माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार प्रकरणाच्या स्थायी समितीला ही माहिती दिली आहे.
image.png
मेजर जनरल आमिर अजीम बाजवा यांनी चाईल्ड पॉर्नोग्राफीवर रिपोर्ट देताना सांगितले की, “देशातील ८ लाख पॉर्न साईट्स ब्लॉक करण्यात आल्या आहेत. ज्यात २३८४ चाईल्ड पॉर्नोग्राफी साईट्सचा समावेश आहे. त्यांनी म्हटले की, गुगलनेही विचारले की, देशात या साईट्समध्ये कमतरता कशी आली आहे. आम्ही त्यांनाही रिपोर्ट दिला आहे.”

त्यांनी सांगितले की, “पाकिस्तानी मुलांच्या अश्लील सामग्रीवर बंदी आणण्यासाठी सतत इटंरपोलशी संपर्क सुरु आहे.” बाजवा यांनी पुढे म्हटले की, “पाकिस्तानात अश्लील सामग्रीला अपलोड करण्याच्या प्रमाणाची माहिती मिळाली नाही. परंतु वीपीएन(व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) आणि प्रॉक्सीद्वारे आताही पॉर्न पाहण्यात येत आहे.”
image.png
पाकिस्तान दूरसंचार प्राधिकरणने (पीटीए) आतापर्यंत ११ हजार प्रॉक्सी ब्लॉक केले आहेत. वीपीएनच्या निगरानीसाठीही नव्या पद्धतींवर काम केले जात आहे.