इंडियन आर्मीच्या ‘या’ 15 रेजिमेंटचं नाव ऐकताच पाकिस्तान ‘टरकतं’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्य दलाने अनेक युद्धे ही आपल्या सैनिकांच्या आणि त्यांनी केलेल्या योजनांच्या जोरावर जिंकली आहेत. पूर्वापार काळापासून इंडियन आर्मीमध्ये विशेष रेजीमेंट करून लढण्याची परंपरा राहिलेली आहे. प्रत्येक रेजीमेंटला ज्या त्या वैशिष्ट्यांप्रमाणे नावे दिली जातात.

1. पॅराशूट रेजीमेंट – 29 ऑक्टोबरला 1941 ला पॅराशूट रेजिमेंटचे स्थपणा झाली.1999 मध्ये कारगिल युद्धाच्या वेळी 10 पैकी 9 पॅराशूट बटालियनी महत्वाची भूमिका बजावली होती. पॅराशूट रेजिमेंटचे कमांडो दुनियेतील सर्वात खतरनाक कमांडो आहेत.

Image result for पॅराशूट रेजीमेंट

2. गोरखा रेजीमेंट – जय महा काली, आले गोरखाली या घोषणेनेच शत्रूचे धाबे दणाणून जात होते. शत्रूचा खात्मा करणे हेच या रेजिमेंटचे सर्वात महत्वाचे लक्ष होते.

Image result for indian army गोरखा रेजीमेंट

3.राजपूत रेजीमेंट – ब्रिटीश आर्मी ने 1778 मध्ये बंगाल नेटिव इनफ़ेंट्री च्या माध्यमातून हैदर अली विरुद्ध कुड्डालोर वर विजय मिळवला होता. या विजयासाठी वेगवेगळ्या दिशांना असलेले कटारींचे चिन्ह देण्यात आले होते. हेच चिन्ह आजपर्यंत राजपूत रेजिमेंटची निशाणी आहे.

Image result for indian army राजपूत रेजीमेंट

4. ग्रेनेडियर्स रेजीमेंट –
ही लष्करातील सर्वात शक्तिशाली रेजिमेंट आहे. या रेजिमेंटचे एकाच घोषवाक्य आहे ‘सर्वदा शक्तिशाली’ म्हणजेच कोणत्याही परिस्थितीत शत्रू समोर स्वतःला शक्तिशाली म्हणून प्रस्थापित करणे.

Image result for indian army ग्रेनेडियर्स रेजीमेंट

5. मैकेनाइज्ड इंफ्रेंट्री रेजीमेंट –
1979 मध्ये या रेजिमेंटची स्थापना करण्यात आली. श्रीलंकेमध्ये ऑपरेशन पवन, पंजाब आणि जम्मू-कश्मीरमध्ये  ऑपरेशन रक्षक आणि जम्मू – कश्मीरमध्ये ऑपरेशन विजयमध्ये सुद्धा सहभागी होती. लद्दाख आणि सिक्कीम येथे या रेजिमेंटने विशेष गौरव प्राप्त केलेला आहे.

Image result for indian army मैकेनाइज्ड इन्फेंट्री रेजिमेंट

6. पंजाब रेजीमेंट – जो बोले सो निहाल सत श्री अकाल या घोषणेबाबत काही वेगळे सांगायची गरज नाही कारण अनेक शत्रू फक्त हे ऐकताच पळून जातात. लोगेंवालाच्या लढाईत या रेजिमेंटने केलेली कामगिरी सर्व देशाने पाहिलेली आहे.

Image result for indian army पंजाब रेजीमेंट

7. जाट रेजीमेंट – सैन्य दलातील सर्वात जुनी आणि जास्त पदक जिंकलेली ही रेजिमेंट आहे. स्वातंत्र्यानंतर या रेजिमेंटने आठ महावीर चक्र, आठ कीर्ति चक्र, 32 शौर्य चक्र, 39 वीर चक्र आणि 170 सेना पदक जिंकले आहेत.

Image result for indian army जाट रेजीमेंट

8. मद्रास रेजीमेंट –
1750 मध्ये इंग्रजांनी या रेजिमेंटचे स्थापना केली होती. ही सर्वात जुनी रेजिमेंट असून यात २३ बटालियन आहेत.

Related image

9. सिख रेजीमेंट – लष्करातील ही एक महत्वाची रेजिमेंट आहे. या रेजिमेंटने 72 लड़ाई ऑनर्स, 15 रंगमंच ऑनर्स, 2 परमवीर चक्र, 14 महावीर चक्र, 5 कीर्ति चक्र, 67 वीर चक्र आणि 1596 अन्य वीरता पुरस्कार जिंकले आहेत.

Image result for indian army सिख रेजीमेंट

10. डोगरा रेजीमेंट – 1877 मध्ये इंग्रजांनी या रेजिमेंटची स्थापना केली होती. या रेजिमेंटने अनेकदा युद्धामध्ये पाकिस्तानला धूळ चार्ली आहे.

Image result for डोगरा रेजीमेंट

11. कुमाऊं रेजीमेंट –
या रेजिमेंटची स्थापना ब्रिटिश काळातच झाली होती. या रेजिमेंटच्या नावे 2 परम वीर चक्र, 4 अशोक चक्र, 10 महावीर चक्र, 6 कीर्ति चक्र आणि अनेक पुरस्कार आहेत.

Related image

12. असम रेजीमेंट –
15 जून 1941 मध्ये या रेजिमेंटची स्थापना झाली. या रेजिमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर नॉर्थ ईस्ट कडील सैनिकांची भरती होते.

Image result for असम रेजीमेंट

13. बिहार रेजीमेंट – बर्मा युद्ध, दुसरे महायुद्ध यामध्ये बिहार रेजिमेंटने भाग घेतलेला आहे. कारगिरील युद्धाच्या वेळी मोठा पराक्रम या रेजिमेंटने गाजवला होता. मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात बिहार रेजिमेंटचे संदीप उन्नीकृष्णन यांना वीर मरण आले होते.

Image result for बिहार रेजिमेंट

14. महार रेजीमेंट –
1 परमवीर चक्र, 4 महावीर चक्र यासोबतच असे अनेक पुरस्कार महार रेजिमेंटच्या नावे आहेत. देशातील सर्व राज्यांतून या रेजिमेंटमध्ये भरती केली जाते.

Image result for महार रेजीमेंट

15. नगा रेजीमेंट – ही रेजिमेंट लष्करातील सर्वात नवीन रेजिमेंट आहे. 1970 मध्ये या रेजिमेंटची स्थापना करण्यात आली होती. बांग्लादेशच्या वेळेस या रेजिमेंटने महत्वाची भूमिका निभावली होती. कारगिल युद्धात देखील द्रास सेक्टर ची कमान याच रेजिमेंटच्या हाती होती.

Image result for indian army नगा रेजीमेंट