पाकिस्ताननं रचला ‘कट’, ‘सत्यता’ जाणून गुप्‍तचर यंत्रणांची उडाली ‘भंबेरी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भडकलेला पाकिस्तान भारतात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची तसेच भारताला बरबाद करण्याची स्वप्ने पाहत आहे. त्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था खिळखिळी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात 2 हजार रुपयांच्या नकली नोटा छापण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच पाकिस्तानातून आलेल्या 2 हजार रुपयांच्या नकली नोटा मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानमधून येणाऱ्या या नकली नोटांमध्ये खऱ्या नोटांप्रमाणेच असणाऱ्या सुरक्षा बाबींचा वापर करण्यात येत आहे. यासाठी हुबेहूब नोटा छापण्यात येत असून यामुळे ती नकली आहे कि असली हे समजणे कठीण जाणार आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, काराचीमधील ‘मलीर-हाल्ट’ परिसरातील पाकिस्तानी सिक्योरिटी प्रेसमध्ये या नोटा छापल्या जात असून यासाठी ‘ऑप्टिकल वेरिअबल इंकचा वापर करण्यात आला आहे. या इंकची खासियत म्हणजे नोटेवर हि शाई हिरव्या रंगाची दिसून येते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी पाकिस्तानमधून येणाऱ्या नकली नोटांमध्ये या प्रकारच्या शाईचा वापर करण्यात येत नव्हता. या शाईचे उत्पादन एक विदेशी कंपनी करत असून मोजक्याच देशांना हि शाई उपलब्ध करून दिली जाते.

कराचीमधील प्रेसमध्ये या नोटा छापल्यानंतर दाऊदच्या व्यक्तींकडे या नकली नोटा भारतात पसरवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय तपास यंत्रणांनी केलेल्या तपासात उघड झाले आहे कि, या नकली नोटांची हुबेहूब नक्कल करण्यात आली असून अनेकांनी या नोटा ओळखणे अवघड जात आहे.

दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 24 ऑगस्ट रोजी दाऊदच्या एका हस्तकला अटक केली होती. त्याच्याकडून जवळपास 2 हजार रुपयांच्या साडेपाच लाख रुपये किमतीच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता तपास यंत्रणा सतर्क झाल्या असून सगळीकडे छापेमारी सुरु केली आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –