पाकिस्तानचं नेपाळच्या पावलावर पाऊल, वादग्रस्त नकाशा मंजूर करत भारताच्या ‘या’ भागावर केला दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळच्या मार्गावर आता पाकिस्तान सुद्धा निघाला आहे. पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने एका वादग्रस्त नकाशाला मंजूरी दिली आहे. नकाशात पाकिस्तानने काश्मीर आपले असल्याचे दर्शवले आहे. यापूर्वी पाकिस्तान केवळ पीओके आपला भूभाग असल्याचे सांगत होता, परंतु आता नव्या नकाशात काश्मीरचा समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तानने नवीन नकाशात लडाख, सियाचिनसह गुजरातच्या जूनागढपर्यंत दावा केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी यास पाकिस्तानच्या इतिहासातील सर्वात ऐतिहासिक दिवस म्हटले आहे.

या वादग्रस्त नकाशाला इम्रान खान यांच्या कॅबिनेटमध्ये मंजूरी मिळाली आहे. कॅबिनेट बैठकीनंतर इम्रान खान यांनी नवा राजकीय नकाशा जारी केला. नकाशात काश्मीरला पाकिस्तनचा भाग दर्शवले आहे. पाकिस्तानच्या अगोदर नेपाळने सुद्धा असाच प्रकार केला होता. त्याने सुद्धा वादग्रस्त नकाशाला मंजूरी दिली, ज्यामध्ये भारताचा कालापानी, लिपुलेख आणि लिंपियाधुराचा समावेश केला आहे. नेपाळने वादग्रस्त नकाशा 20 मे रोजी जारी केला होता, ज्यास तेथील ससंदेने मंजूरी दिली. हा वादग्रस्त नकाशाला आता ते संयुक्त राष्ट्र संघ (युएनओ) आणि गुगलसह अंतरराष्ट्रीय समुदायास पाठवण्याची तयारी करत आहे.

पाकिस्तानने हा वादग्रस्त नकाशा जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवले, या घटनेला एक वर्ष पूर्ण होण्याच्या बरोबर एक दिवस अगोदर जारी केला आहे. मागच्या वर्षी 5 ऑगस्टला जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मोदी सरकारने निर्णय घेतला होता. भारताच्या या पावलानंतर पाकिस्तानने अंतर्गत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने अंतराष्ट्रीय पातळीवर आवाज उठवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. आणि आता आपल्या देशातील जनतेला खुश करण्यासाठी त्याने नवा नकाशा जारी केला आहे. या दरम्यान, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी म्हटले की, नव्या नकाशाचा शाळांच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात येईल.