आंतरराष्ट्रीयक्रीडा

Pakistan captain Babar Azam | कुराणवर हात ठेवून बाबर आझमच्या ’गर्लफ्रेंड’ने घेतली शपथ, म्हणाली – ’10 वर्षापर्यंत शोषण करत होता पाकिस्तानी कर्णधार’

नवी दिल्ली : Pakistan captain Babar Azam | पाकिस्तान (Pakistan) ने टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) मध्ये पहिल्यांदाच भारताचा जबरदस्त पराभव केला. भारताच्या  पराभवापेक्षा पाकिस्तानच्या विजयाची चर्चा सध्या जोरात आहे. संपूर्ण पाकिस्तान सध्या कर्णधार बाबर आझमला (Pakistan captain Babar Azam) आपला हिरो मानत आहे. मात्र बाबर आझम आपल्या वैयक्तिक जीवनात अनेकदा वादग्रस्त ठरला आहे. स्वताला बाबर आझमची गर्लफ्रेंड (Girlfriend) म्हणवणार्‍या हमीजा मुख्तार (Hamiza Mukhtar) ने या दरम्यान एक नवीन दावा करून बाबरच्या विजयाच्या आनंदोत्सवावर विरजन टाकले आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र ’डेली पाकिस्तान’ (Daily Pakistan) च्या रिपोर्टनुसार, बाबरच्या गर्लफ्रेंड (Babur’s girlfriend) चा दावा आहे की, बाबरने विवाहाचे आश्वासन देऊन तिचे लैंगिक शोषण (sexually abused) केले. आता तो निकाह करण्यास नकार देत आहे. महिलेने पुढे म्हटले आहे की, ती बाबर आझमच्या मुलाची आई होणार होती.

20 लाख रुपयांची दिली होती ऑफर
वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, हमीजाने बाबर आझमविरूद्ध (Pakistan captain Babar Azam)
पाकिस्तानी कोर्टात (Pakistani court) धाव घेतली आहे, जिथे तिने पाकिस्तानी कर्णधाराविरूद्ध छळ केल्याचे प्रकरण दाखल केले आहे. तिने मागील काही दिवसांपूर्वी असाही दावा केला होता की, बाबरच्या कुटुंबाने संपूर्ण वाद मिटवण्यासाठी तिला 20 लाख रुपये देण्याची ऑफर दिली होती.

बाबरकडून (Pakistan captain Babar Azam) हा प्रस्ताव अशावेळी आला आहे जेव्हा त्याच्याविरूद्ध ब्लॅकमेल आणि छळाचे प्रकरण लाहोर हायकोर्टात प्रलंबित आहे.

हातात कुराण घेऊन घेतली शपथ

हमीजाने आरोप करत म्हटले, बाबरने तिचा लैंगिक छळ केला आणि पैशांची फसवणूक केली. आमचे एकमेकांवर प्रेम होते. 2011 मध्ये ते घरातून पळून गेले होते. या दरम्यान दोघे लाहोरमध्ये अनेक भागात राहिले. 10 वर्षापूर्वी जेव्हा आमचे प्रेमप्रकरण सुरू झाले तेव्हा आम्ही दोघे अल्पवयीन होतो.

दरम्यान हमीजाने अनेक पुरावे सुद्धा सादर केले आहेत. रिपोर्टमध्ये पुढे म्हटले आहे की, हमीजाने हातात पवित्र कुराण (Holy Quran) घेऊन म्हटले होते की, ते कोर्टात विवाह करण्यासाठी 2011 मध्ये घरातून पळाले होते. कारण त्यांच्या कुटुंबांना हा विवाह मंजूर नव्हता. बाबर मला त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला जिथे आमही अनेक दिवस सोबत राहिलो. मी बाबरसोबत विवाह करण्यासाठी माझ्या घरातून 2 लाखाचे दागिने चोरले होते. मी बाबर आझमसाठी माझी कार सुद्धा विकली आणि त्याला 12 लाख रुपये दिले.

दबावामुळे केला गर्भपात (abortion)

हमीजाने पुढे धक्कादायक खुलासा करत म्हटले की, इतका पैसा घेऊनही बाबर माझ्यावर खुश नव्हता आणि तो माझ्यासोबत सतत भांडण करू लागला. बाबरच्या अशा वागण्याने हमीजाने नंतर पोलिसांकडे त्याच्याविरूद्धा तक्रार केली.

तिने सांगितले की, इतके वर्ष लग्नाचे आमिष दाखवत तो लैंगिक शोषण (sexually abusing) करत होता. मी बाबरच्या मुलाची आई होणार होते, परंतु पाकिस्तानी कर्णधाराने दबाव आणून मला गर्भपात करण्यास भाग पाडले. बाबर माझ्या मुलाला स्वीकारण्यास तयार नव्हता म्हणून मला गर्भपात करावा लागला होता.

हे देखील वाचा

Pune Corporation GB | नदीकाठ सुधार योजनेचे 3 टप्प्यांचे काम होणार पीपीपी तत्वावर; 700 कोटी रुपयांचे एका टप्प्याचे काम पालिका निधीतून तर उर्वरित 2 टप्पे ‘पीपीपी’मधून करण्याचा निर्णय

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pakistan Captain Babar Azam | pakistan cricket team captain babar azam girlfriend hameeza mukhtarshares shocking affair know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update