पाकिस्तानच्या ‘कुरापती’ अद्यापही सुरू, आता आंतरराष्ट्रीय सीमेवर केलं ‘शस्त्रसंधी’च उल्‍लंघन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानच्या लष्कराच्या कुरघोड्या थांबण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानच्या सैनिकांनी पुन्हा एका शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय हद्दीत मोठ्या प्रमाणात गोळीबार केला आहे. कठुआ जिल्ह्यातील हिरानगर सेक्टरमध्ये हा गोळीबार करण्यात आला आहे. भारतीय सैनिकांनी देखील याचे जबरदस्त प्रत्युत्तर दिले. याआधी देखील बालाकोटमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वतीने टाकण्यात आलेली नऊ  मोर्टार भारतीय लष्कराने नष्ट केली होती.

पाकिस्तानी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात  मोर्टार हल्ला करून भारतीय लष्करावर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला. बालाकोटमध्ये देखील रविवारी त्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला होता. मात्र भारतीय सैनिकांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले. 2 सप्टेंबर रोजी नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शाहिद झाला होता.

नेडियर हेमराज जाट असे शहीद झालेल्या जवानाचे नाव होते. सैनिकांनी केलेल्या गोळीबारात हा सैनिक गंभीर जखमी झाला होता. 2017 मध्ये नेडियर हेमराज जाट भारतीय लष्करात भरती झाले होते. राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ते रहिवासी होते.

दरम्यान, दररोज पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात भारतीय नियंत्रण रेषेवर गोळीबार केला जात आहे. त्यामुळे आता भारतीय लष्कराकडून देखील त्यांना प्रत्युत्तर दिले जात आहे. मात्र आर्थिकरित्या डबघाईला आलेला असताना देखील पाकिस्तान सुधारण्याचे नाव घेताना दिसून येत नाही.

visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like