Coronavirus : PAK ला ‘कोरोना’शी लढण्यासाठी चीन करणार मदत, पोहचवणार ‘चिकित्सा उपकरणं’

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था –  चीनने पाकिस्तानला शुक्रवारी एका दिवसासाठी दोन्ही देशांच्या सीमा खुल्या करण्यास सांगितले आहे, जेणेकरून कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी वैद्यकीय मदत देशात पोहोचवली जाईल. खुंजराब खिंड सहसा १ एप्रिलला खुली केली जाते. पण COVID-19 च्या जागतिक प्रकोपामुळे पाकिस्तान आणि चीनमधील सीमा अनिश्चित काळासाठी बंद केली गेली आहे.

एका वृत्तसंस्थेनुसार, चिनी दूतावासाने परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, झिनजियांग उइगर स्वायत्त प्रदेशाचे गव्हर्नर गिलगित-बाल्टिस्तानमध्ये वैद्यकीय सामान देणार आहेत. सांगितले जात आहे की, यात २००,०० सामान्य फेस मास्क, २००० एन-९५ फेस मास्क, पाच व्हेंटिलेटर, २००० परीक्षण किट आणि २००० मेडिकल सुरक्षात्मक कपडे पाकिस्तानला दिले जाऊ शकतात.

तसेच सगळे सामान जीबी मुख्यमंत्री हफीजुर रहमान यांच्याकडून शिनजियांग प्रदेशाच्या राज्यपालांना प्रांतात कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी निवेदन केल्यानंतर मिळणार आहे. गिलगित-बाल्टिस्तान मध्ये लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना व्हायरसची प्रकरणे अधिक आहेत. आणि या अविकसित क्षेत्रात व्हेंटिलेटर वैद्यकीय उपकरणेही खूप कमी आहे. प्रांतात आतापर्यंत ८४ पॉजिटीव्ह प्रकरणे दाखल केली गेली आहेत. राष्ट्रीय स्तरावर १,१०२ पर्यंत पोहोचलेली प्रकरणे आणि मरणाऱ्यांची संख्या ८ झाली आहे.