भारताच्या मिराज विमानांकडून जैश-ए-मोहम्मदच्या तळावर १००० किलोचा बाॅम्ब हल्ला

श्रीनगर : वृत्तसंस्था  भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करीत पाकिस्तानातील दहशतवादी तळांचा नायनाट केला. मंगळवारी पहाटे मिराज २००० या १२ लढाऊ विमाने पाकिस्तानची नियंत्रण रेषा ओलांडून गेली आणि त्यांनी दहशतवादी तळांचा नायनाट केला आहे.

भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपाशी असणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हा  हल्ला केला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार जवळपास १००० किलो स्फोटकांचा वापर करत हे तळ नष्ट करण्यात आले आहेत. जैशच्या तळांवर केलेला हा हल्ला पाकिस्तानचा गाफील ठेवू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. भारतीय वायुदलाच्या मिराज २००० या १२ लढाऊ विमानांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. वॉर मेमोरियलच्या सरावाच्या निमित्ताने या विमानांनी उड्डाण केल्याची माहिती समोर येत आहे.

संरक्षण खात्याने अद्यापही या वृत्ताला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. पण, पाकिस्ताननेही हा हल्ला झाल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भारतीय सैन्याची ही एक मोेठी कारवाई ठरत आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

भारतीय हल्ल्याचा पाकिस्तानने व्हिडिओ केला जारी

भारताने केलेल्या बाॅम्ब हल्यात जैशचे लाँच पॅड, नियंत्रण कक्ष उध्वस्त 

पाकिस्तानवर बाॅम्बहल्ला : पंजाबमधील आदमपूरहून केली कारवाई